वरूड तहसील कार्यालयातील २१ अधिकारी-कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:08+5:302021-02-05T05:24:08+5:30
आमदारांची अचानक भेट : जिल्हाधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश वरूड : शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा ...

वरूड तहसील कार्यालयातील २१ अधिकारी-कर्मचारी गैरहजर
आमदारांची अचानक भेट : जिल्हाधिकाऱ्यांना दिले कारवाईचे निर्देश
वरूड : शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा आठवडा केला. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाचही दिवस सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात पोहोचणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. देवेंद्र भुयार यांनी सोमवारी वरूड तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता अचानक भेट दिली. त्यावेळी ३४ पैकी तब्बल २१ अधिकारी, कर्मचारी गैरहजर आढळले. त्यामध्ये चार नायब तहसीलदार, तीन अव्वल कारकून, नऊ महसूल सहायक, पाच शिपायांचा समावेश आहे.
कर्मचारी खरेच वेळेवर येतात का, याची तपासणी सोमवारी आ. भुयार यांनी केली. काही कर्मचारी नेहमीप्रमाणे उशिरा आल्याचे दिसून आले. कार्यालयात गैरहजर असलेल्या व उशिराने आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. तहसील कार्यालयात उशिरा येणाऱ्या व गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना आ. देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना केल्या.
------------