ेविद्यार्थ्यांनी बनविली पक्ष्यांसाठी २०० घरटी

By Admin | Updated: May 18, 2015 00:18 IST2015-05-18T00:18:24+5:302015-05-18T00:18:24+5:30

पर्यावरण पे्रेमी, ध्येयवेडया शिक्षकाने विद्यार्थ्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करुन टाकाऊ पृष्ठापासून पक्ष्यांसाठी २००.....

200 nesting for birds made by the students | ेविद्यार्थ्यांनी बनविली पक्ष्यांसाठी २०० घरटी

ेविद्यार्थ्यांनी बनविली पक्ष्यांसाठी २०० घरटी

रामकृष्ण क्रीडा विद्यालयात उपक्रम : पक्षिमित्र शिक्षकाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अमरावती : पर्यावरण पे्रेमी, ध्येयवेडया शिक्षकाने विद्यार्थ्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करुन टाकाऊ पृष्ठापासून पक्ष्यांसाठी २०० घरटी बनविली. रामकृष्ण क्रीडा विद्यालयातील कला शिक्षक पी.आर.पाटील यांनी हा उपक्रम राबविला असून त्यातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पी.आर.पाटील सामाजिक वनीकरण विभाग, राष्ट्रीय हरित सेना व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या प्रेरणेतून पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवित आहेत. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी आणि अन्न मुबलक प्रमाणात मिळू शकत नाही. त्यामुळे पक्षी मानवी वस्तीवर अवंलबुन राहतात. पक्ष्यांचा निसर्ग संवर्धनात बहुमोल वाटा आहे. त्यामुळे पक्षी वाचविणे हे मानवाचे कर्तव्यच आहे. अशी भावना ठेवून पी.आर. पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून पक्षी संवर्धनाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यांनी पक्षी संवर्धनाचे कार्य स्वत:च्या घरापासूनच सुरु केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचा मुलगा शंतनू पाटील यानेही घराच्या आवारात पक्ष्यांना आश्रय देऊन पक्षी संवर्धनाचे कार्य सुरु केले आहे. शिक्षक पाटील हे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत निसर्ग संवर्धनाचे धडे सुध्दा देत आहेत. पाटील यांनी हरित सेनेच्या माध्यमातून एक हजार विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनात सहभागी केले आहे. उन्हाळा सुरु होण्याआधीच पाटील यांनी पक्ष्यांसाठी घरटे बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली. विद्यार्थ्यांनी विविध टाकाऊ साहित्य गोळा करुन पक्ष्यांसाठी सुंदर घरटी बनविली आहेत. ही घरटी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात लावण्याचा संकल्प आहे. हा उपक्रम हव्याप्रमंचे पदाधिकारी देखील राबवित आहेत.

पक्षी संवर्धन उपक्रम घराघरांपर्यंत पोहोचविणार
निसर्ग संवर्धनाचा उपक्रम घराघरांपर्यंत पोहोचविण्याचा मानस पी.आर. पाटील यांचा आहे. त्यांनी पक्षी संवर्धनासाठी भित्तीपत्रके तसेच पोस्टर तयार केले असून ते शहरातील विविध भागांत लावण्यात येत आहे. घराजवळ पक्षी राहू शकतील, असे वातावरण निर्माण करा. पक्ष्यांना धोका निर्माण करु नका, स्वयंपाक घरातील उरलेले खाद्यपदार्थ पक्ष्यांना खायला द्या, पक्ष्यांसाठी स्वच्छ पाणी ठेवा, पक्ष्यांसाठी घरटी तयार करा, अशा आशयाची रंगीत चित्रे व पोस्टर्सही त्यांनी बनविली आहेत.

Web Title: 200 nesting for birds made by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.