शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

घरातून २०० ग्रॅम सोने चोरले; त्रिकूट दहा महिन्यांनी पकडले

By प्रदीप भाकरे | Updated: August 3, 2024 13:16 IST

Amravati : चार गुन्हे उघड, १०. ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त, क्राईम युनिट दोनची कारवाई

अमरावती : स्थानिक भिवापूरकर लेआउट महेश भवन येथील रहिवाशी विजय विश्वेश्वर चौधरी यांच्या घरातून तब्बल २०० ग्रॅम सोन्याचे व ८० ग्रॅम सोन्याचे दागिणे चोरीला गेले होते. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास तो प्रकार उघड झाला होता. त्याप्रकरणी तब्बल दहा महिन्यांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या आरोपींनी चौधरी यांच्याकडील चोरीसह बडनेरा पोलिसांत नोंद तीन अशा एकुण चार गुन्हयांची कबुली दिली आहे. आरोपींकडून १०. ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट दोनने शनिवारी ही यशस्वी कारवाई केली.             

६ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.५० च्या सुमारास विजय विश्वेश्वर चौधरी हे घराला कुलुप लावुन ईलेक्ट्रिक बिल भरण्याकरीता गेले. दुपारी दिडच्या सुमारास घरी परतले असता चोरीचा प्रकार उघड झाला होता. त्या २०० ग्रॅम सोने व ८० ग्रॅमची चांदी किंमत तत्कालिन ठाणेदार सीमा दाताळकर केवळ २.६७ लाख रुपये इतकी तोडकी लावली होती. राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्हयाचा समातंर तपास करीत असतांना अक्षय दिनेशकुमार गुप्ता (२५ वर्ष रा. चनकापूर, नागपूर), चेतन मनोज बुरडे (वय २३, रा. नंदनवन, नागपुर) व शुभम श्रीधर डुंबरे (वय ३०, रा. नंदनवन नागपुर) यांना या गुन्हयात अटक करून त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी येथे चार गुन्हे केल्याची कबुली दिली. तीनही आरोपींकडून एकूण १४७ ग्राम सोन्याची लगड व ५० ग्राम चांदीची लगड जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर, सागर पाटील व गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरिक्षक महेश इंगाले व सत्यवान भुयारकर, उपनिरिक्षक संजय वानखडे, पोलीस अंमलदार मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, अमर कराळे, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, संदीप खंडारे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीRobberyचोरीAmravatiअमरावती