२० पोलिसांची प्रकृती बिघडली
By Admin | Updated: September 4, 2014 23:27 IST2014-09-04T23:27:13+5:302014-09-04T23:27:13+5:30
दूषित पाणी पिण्यात आल्याने प्रशिक्षणार्थी २० पोलिसांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती जिल्हा पोलीस

२० पोलिसांची प्रकृती बिघडली
दूषित पाण्याचा प्रभाव : पोलीस अधीक्षकांची माहिती
अमरावती : दूषित पाणी पिण्यात आल्याने प्रशिक्षणार्थी २० पोलिसांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभू यांना मिळताच त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांकडून आढावा घेतला.
नुकत्याच घेण्यात आलेल्या अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस भरतीत २२८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. नव्याने रुजू झालेल्या या पोलिसांना पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देणे सुरु आहे. बुधवारी या कर्मचाऱ्यांना नळाचे पाणी मिळाले नसल्याने त्यांना बोअरचे पाणी प्यावे लागले. यातील काही कर्मचाऱ्यांना याची बाधा झाली. त्यामुळे दूषित पाणी पिण्यात आल्याने यातील वीस पोलिसांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडली. त्यांना उलटी, संडास होणे सुरु झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दूषित पाणी पिण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली असल्याचे निदान डॉक्टरांनी सांगितले. यातील दोन महिला कर्मचाऱ्यांना टायफाईड व एका कर्मचाऱ्याला गॅस्ट्रो झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभू यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.