ग्रामपंचायतीचे २० सदस्य अपात्र
By Admin | Updated: May 7, 2015 00:08 IST2015-05-07T00:08:52+5:302015-05-07T00:08:52+5:30
जिल्ह्यात २०१२-१३ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या परंतु निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर न

ग्रामपंचायतीचे २० सदस्य अपात्र
२०१२-१३ मधील निवडणूक : मुदतीत खर्च सादर न केल्याने कारवाई
अमरावती : जिल्ह्यात २०१२-१३ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या परंतु निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर न करणाऱ्या ३२ उमेदवारांविरोधात मुंबई ग्रामपंचायत अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी पाच वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई केली आहे. यापैकी २० सदस्य निवडून आलेले आहेत. ९२ उमेदवारांविरोधात प्रकरणे कार्यवाहीसाठी प्रक्रियेत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांद्वारे प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांकडे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने सादर करणे बंधनकारक आहे. सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यातील १९२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली. यामध्ये ३ हजार २२६ उमेदवार उभे होते. यापैकी २ हजार ४२९ उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर केले. परंतु ७९७ उमेदवारांनी खर्च सादर केला नाही. यामध्ये १३८ निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश आहे. ही प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलीत.
या सदस्यांवर झाली अपात्रतेची कारवाई
निवडणूक खर्च सादर न केल्याने ५ वर्षांकरिता निवडणूक लढण्यास अपात्र ठरविण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये चिंचोली बु. येथील सुचिता केवटी, कैलाश मुरे, शरद गणगणे, नलिनी भरडे, कौशल्या अढाव, जवर्डी येथील कुंदा भिसे, निवृत्ती मांजरे, चंद्राबाई बोखाल, अभिजित मांजरे, पोहरा पूर्णा येथील राजू मेश्राम, दीपिका नेतनराव, विकास बोबडे, विद्या कांबळे, शकुंतला नेवाळकर, धम्मनंद गोंदने, रिता वैराळे, मिर्झापूर येथील विशाखा कांबळे, विशाखा घरडे, दिनेश सुखदेवे, प्रभाकर चुनडे यांचा समावेश आहे.
या उमेदवारांवर झाली कारवाई
निवडून न आलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांच्यावरही अपात्रतेची कारवाई करण्यात आली. यामध्ये खोलापूर येथील सविता भटकर, बंडू वर्धे, चक्रधर खोडस्कर, सचिन बोथरिया, शमशाद बी जाकीर, पूर्णानगर येथील पवन भटकर, रामकृष्ण गवई, राजकन्या खटे, वनमाला बोबडे, गणेश कोल्हे, चेतन ढोले, दुर्योधन आठवले, रफीक शहा, अहमद शहा, श्याम आठवले यांचा समावेश आहे.