तापमानात २ ते ३ अंशाने कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:47+5:302021-05-19T04:13:47+5:30

-------------------- कोरोनाने १०१८ रुग्ण संक्रमणमुक्त अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असताना, मंगळवारी १,०२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या ...

2 to 3 degrees lower in temperature | तापमानात २ ते ३ अंशाने कमी

तापमानात २ ते ३ अंशाने कमी

--------------------

कोरोनाने १०१८ रुग्ण संक्रमणमुक्त

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असताना, मंगळवारी १,०२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व रुग्णांना आता १४ दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. तसे त्यांच्याकडून लेखी घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

-------------------------

वादळासह पावसाने संत्र्याचे नुकसान

अमरावती : जिल्ह्यात रविवारी झालेल्या वादळासह पावसाने वरूड, मोर्शी, अचलपूर तालुक्यांत नुकसान झाले. प्राथमिक सर्वेक्षणात मात्र हे नुकसान कमी दाखविण्यात आले. त्यामुळे पुन्हा पाहणी करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

-------------------------

शिवारात पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात

अमरावती : या आठवड्यात सर्वच भागात पावसाचे आगमन झाल्याने शेत शिवारांमध्ये खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात झालेली आहे. दुपारी उन्ह असल्याने शेतकरी पहाटे शेतात जाऊन मशागतीचे कामे करतांना दिसत आहे.

-----------------------

महापालिकेची आमसभा २० मे रोजी

अमरावती : महापालिकेची मे महिन्यातील आमसभा २० मे रोजी ऑनलाईन होत आहे. कोरोना संक्रमण वाढते असल्यामुळे आठ ते दहा सर्वसाधारण सभा याच पद्धतीने होत आहेत. या सभेला सर्व गटनेते व ज्येष्ठ सदस्य उपस्थित राहतात. अन्य सदस्य हे ऑनलाईन सहभाग नोंदवितात.

Web Title: 2 to 3 degrees lower in temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.