१ जुलैला विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार
By Admin | Updated: June 29, 2017 00:24 IST2017-06-29T00:24:53+5:302017-06-29T00:24:53+5:30
विदर्भाच्या दिशेने मोठ्या संख्येने ढग मार्गक्रमण करीत असल्यामुळे ३० जून किंवा १ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता....

१ जुलैला विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार
हवामानतज्ज्ञांचा अंदाज : शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाच्या दिशेने मोठ्या संख्येने ढग मार्गक्रमण करीत असल्यामुळे ३० जून किंवा १ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. २७ ते ३० जूनपर्यंत सार्वत्रिक पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम राजस्थान ते बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आहे. सौराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र व चक्राकार वारे वाहत असून ओडिसा ते झारखंडवर ४.८ किलोमीटरवर चक्राकार वारे, दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. मध्यप्रदेशसह महाराष्ट्राच्या बॉर्डरवर पूर्व-पश्चिम खंडित वारे आहेत. यास्थितीमुळे पुढचे दोन दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून ३० जून व १ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २ जुलैपासून विदर्भातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाने दडी दिल्याने शेतकरी यंदाही अडचणीत येण्याची स्थिती असल्याने पावसाची प्रतीक्षा आहे.