३.८२ कोटीतून होणार जनसुविधेची १९९ कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:55+5:302021-03-07T04:12:55+5:30

अमरावती : सन २०१०-११ या आर्थिक वर्षापासून ग्रामपंचायतींना विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. याअनुसार सन २०२०-२१ या वर्षात ...

199 public works works will be done from 3.82 crore | ३.८२ कोटीतून होणार जनसुविधेची १९९ कामे

३.८२ कोटीतून होणार जनसुविधेची १९९ कामे

अमरावती : सन २०१०-११ या आर्थिक वर्षापासून ग्रामपंचायतींना विशेष अनुदान योजना राबविण्यात येत आहे. याअनुसार सन २०२०-२१ या वर्षात जिल्हाभरात ३ कोटी ८२ हजार रुपयांच्या निधीतून १९९ विविध प्रकारची जनसुविधेची कामे केली जाणार आहेत. या कामांना नुकतीच मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जनसुविधेच्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषद पंचायत विभगाने सन २०२०-२१ मध्ये १०० टक्याच्या दीडपट ३ कोटी ८१ हजार रुपयांच्या दीडपट म्हणजे ४ कोटी ५१ लाखांच्या मर्यादेत १३८ कामांचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने आय पास प्रणालीवर १९९ कामांकरीता यादीनुसार ३ कोटी ८२ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी अमोल येडगे यांनी उपलब्ध असलेल्या कामांचे आय पास प्रणालीवरील कामाच्या यादीनुसार सन २०२०-२१ मधील उपलब्ध निधीमधून १९९ कामे मंजूर केली आहेत. या कामांमध्ये आता जनसुविधेच्या ग्रामीण भागातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर निधी १४ पंचायत समितींना पंचायत विभागाने वितरित केलेला आहे. या निधीतून स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम, स्मशानभूमीचे शेड बांधकाम, स्मशानभूमीला तारकुंपण करणे, पोहोच रस्ता, स्मशानभूमीत बैठक व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत.

बॉक्स

पंचायत समितीनिहाय मंजूर कामे

अमरावती ३८, भातकुली ४, नांदगाव खंडेश्र्वर ४, चांदूर रेल्वे ३, धामणगाव रेल्वे १, तिवसा ८, मोर्शी ११, वरूड ८, चांदूर बाजार १२, अचलपूर ३, अंजनगाव सुर्जी ६, दर्यापूर ८, चिखलदरा ७ आणि धारणी ६ अशी एकूण १९९ कामे केली जाणार आहेत.

Web Title: 199 public works works will be done from 3.82 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.