शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नैसर्गिक आपत्तीचे यंदा १९ बळी; १.९८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 19:37 IST

२,७८४ कुटुंबे बाधित

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १९ व्यक्ती नैसर्गिक आपत्तीच्या बळी ठरल्या आहेत. याव्यतिरिक्त लहान-मोठी ५१ जनावरे दगावली. या आपत्तीमुळे २,७८४ कुटुंबे बाधित झाली, तर किमान १ लाख ९८ हजार ८९२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ४२ हजार ८५० हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील १० तालुक्यांनी जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाची सरासरी पार केली. मुसळधार पाऊस, अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर आला. यामध्ये मोठी  वित्तहानी व प्राणहानी झाली. या चार महिन्यांतील आपत्तीमध्ये जिल्ह्यात ५३० गावांमध्ये २,७८४ कुटुंबे बाधित झाली आहेत. १९ जण दगावले. यापैकी ११ जण पुरात वाहून गेले, तर आठ जणांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. सर्वच प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ प्रकरणांमध्ये प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. 

चार महिन्यांच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने २३ मोठ्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला. यापैकी १४ प्रकरणांत ४.२५ लाखांची मदत देण्यात आली. १७ लहान दुधाळ जनावरे मरण पावली. यापैकी चार प्रकरणांत ६४ हजारांची मदत देण्यात आली. याव्यितिरिक्त ओढकाम करणारी सात जनावरे दगावल्याचा अहवाल आहे. या आपत्तीमध्ये २६ घरे पूर्णत: नष्ट झाली. त्यासाठी १ लाख २७ हजार ६५० रुपयांची शासन मदत देण्यात आली. ९६ घरांची अंशत: पडझड झाली. १९०७ कच्च्या घरांची पडझड झाली. यासाठी १० लाख ७५ हजार ३९४ रुपयांची शासन मदत देण्यात आली. ५७७ घरे पूर्णत: नष्ट झाली. यासाठी २ लाख ८४ हजार ९०० रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाद्वारे देण्यात आलेली आहे.  शेतीपिकांचे तालुकानिहाय नुकसान

आपत्तीमध्ये अमरावती तालुक्यात ३१,९४३ हेक्टर, भातकुली तालुक्यात १६१.२५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १०५८ हेक्टर, धामणगाव रेल्वे २८,०३४ हेक्टर, चांदूर रेल्वे २०,६७९ हेक्टर, मोर्शी १९,२७७ हेक्टर, वरूड २९,९७० हेक्टर, अचलपूर ११,०६० हेक्टर, चांदूर बाजार १६१८५ हेक्टर, अंजनगाव सुर्जी १९,३२३ हेक्टर, धारणी ११,७२९ हेक्टर, चिखलदरा तालुक्यात ९३८८ हेक्टरचे नुकसान झालेले आहे. तिवसा व दर्यापूर तालुक्यात नुकसान निरंक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती