शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

अमरावती मध्यवर्ती कारागृहाला मिळाले १९ कोटी; वॉल कम्पाऊंड, रस्ते अन् होणार विद्युतीकरण

By गणेश वासनिक | Updated: February 8, 2024 18:15 IST

कारागृह प्रशासनाचे महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी या विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर रिक्त पदभरती, बंदीजनांसाठी पायाभूत सुविधा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवासस्थानांचे प्रश्न मार्गी लावल्यास प्राधान्य दिले आहे.

अमरावती: येथील ब्रिटीशकालीन मध्यवर्ती कारागृहात विविध कामांसाठी गृह विभागाने १९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात महत्वाचे म्हणजे कारागृह परिसराला संरक्षण भिंत साकारली जाणार असून बाह्य रस्ते निर्मितीसह एकुणच परिसरात विद्युतीकरण करण्यात येणार आहे. तसेच २०४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कारागृह परिसराला वेढा असणार आहे. आता कारागृह अधिकारी-कर्मचारी, कैद्यांच्याही बारीकसारीक बाबी कॅमेऱ्यात कैद होणार आहे.

कारागृह प्रशासनाचे महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी या विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर रिक्त पदभरती, बंदीजनांसाठी पायाभूत सुविधा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवासस्थानांचे प्रश्न मार्गी लावल्यास प्राधान्य दिले आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या बाह्य भागात नागरीवस्ती असल्यामुळे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा मोठा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या रिंगरोडवरून गांज्याचे बॉल निरंतरपणे येत असल्याचे उघडकीस आले आहे. नेमके हे गांज्याचे बॉल नेमके कोणासाठी येतात, बंदीजनांपर्यंत कोण पोहोचतो? हा संशाेधनाचा विषय आहे. तथापि, कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी एकूणच परिसराला आवार संरक्षण भिंत बांधकाम १३, ७७, ८०, ५५६ रूपये निधी, बाह्य रस्ते आणि विद्युतीकरणासाठी ५, ४६, ५५, ६९४ ईतक्या पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून निधीला देखील ७ फेब्रुवारी रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.२०४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वेढाकारागृहाच्या आत आणि बाहेरील भागात बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आता २०४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्याकरिता स्वंतत्र निधी मंजूर झाला आहे. अधिकारी, कर्मचारी, बंदीजन यासह एकूण महत्वाच्या घडामोडींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरअसणार आहे. प्रवेशद्वारापासून तर आतील परिसर, मागील बाजुकडील महामार्गावर, चांदूर रेल्वे मार्ग, वडाळी रस्ता, मुख्य दर्शनी भाग, वसाहतीचा भाग, शेतीचा परिसर आदी महत्वाचे परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीjailतुरुंग