आरोग्य विभागाच्या दिमतीला १८ लसीकरण वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST2021-08-22T04:15:35+5:302021-08-22T04:15:35+5:30

अमरावती : कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात कोरोनाच्या तिसरी लाटेची ...

18 vaccination vehicles for Dimti of health department | आरोग्य विभागाच्या दिमतीला १८ लसीकरण वाहने

आरोग्य विभागाच्या दिमतीला १८ लसीकरण वाहने

अमरावती : कोरोनावर सध्या प्रभावी औषध नसल्यामुळे लस ही ढाल म्हणून काम करीत आहे. येत्या काळात कोरोनाच्या तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेऊन शासनाच्यावतीने अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला २० ऑगस्ट रोजी ‘सद्भावना जीवनरथ’ ही १८ लसीकरण वाहने मुख्यमंत्र्याच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आले आहेत. ही लसीकरण वाहने १४ तालुक्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोरोना लसीकरणाकरिता विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना जीवनरथ लसीकरण वाहनांचे उपलब्ध करून दिली आहेत. लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण करण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्य विभागाला ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्याला प्राधान्य दिले आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करताना लसीकरण अत्यंत आवश्यक असल्यामुळे जिल्ह्याला ही वाहने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जा मंत्री नितीन राऊत व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: 18 vaccination vehicles for Dimti of health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.