एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीचे १८ खेळाडू राज्यस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:00+5:302021-02-14T04:13:00+5:30
नांदगाव खंडेश्वर : स्थानिक एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीच्या १८ खेळाडूंची १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान अमरावती ...

एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीचे १८ खेळाडू राज्यस्तरावर
नांदगाव खंडेश्वर : स्थानिक एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीच्या १८ खेळाडूंची १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान अमरावती येथे होणाºया राज्यस्तरीय जुनिअर व राज्यस्तरीय सब-जुनिअर धनुर्विद्या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. यात सिद्धू चांदणे, लखन लहाबर, अनिरुद्ध खंडारे, हर्षल दैत, कुणाल चवाळे, अच्युत बेर्डे, प्रणव शातलवार, जय साखरकर, प्रीतेश ढोके, अभिजित गांजाळे, राम दुधे, कोमल डवरे, वैदेही राठोड, मंजिरी अलोणे, राजनंदिनी तलवार, सानिका चांदुरकर, श्रेया खंडार यांची निवड झाली आहे.
जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्यावतीने अमरावती येथे जिल्हास्तरीय ज्युनियर व सबज्युनियर धनुर्विद्या स्पर्धा नुकत्याच आयोजित केल्या होत्या. यातून त्यांची निवड करण्यात आली. या खेळाडूंचे संस्थेचे मार्गदर्शक सदानंद जाधव, धनुर्विद्या प्रशिक्षक अमर जाधव, विलास मारोटकर, अनूप काकडे, उत्तमराव मुरादे, राजेंद्र लवंगे, विशाल ढवळे, पवन जाधव, उमेश परसनकर यांनी कौतुक केले.