बैरागड गावातून १८ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:01+5:302021-05-30T04:11:01+5:30
बेैरागड येथील शेख वाजिद शेख सत्तार (४९) याच्या घरी गांजा साठवून ठेवला असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. त्या ...

बैरागड गावातून १८ किलो गांजा जप्त
बेैरागड येथील शेख वाजिद शेख सत्तार (४९) याच्या घरी गांजा साठवून ठेवला असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांनी पथकासमवेत शेख वाजीद शेख सत्तार याच्या घरी धाड घातली. तेथून १ लाख ८३ हजार ७० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. त्याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. डीबीचे मंगेश भोयर, पोलीस कर्मचारी प्रकाश गिरडकर, सचिन होले, जगत तेलगोटे, मोहित आकाशे, अनुराग पाल, कोमल पुरते यांचा या कारवाईत सहभाग होता.