राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत १८ सुवर्णांचा वर्षाव
By Admin | Updated: November 25, 2015 00:42 IST2015-11-25T00:42:59+5:302015-11-25T00:42:59+5:30
विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धेचा मंगळवारी थाटात समारोप झाला.

राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत १८ सुवर्णांचा वर्षाव
समारोप : कोल्हापूर प्रथम, मुंबई द्वितीय, पुणे तृतीय
अमरावती : विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तर शालेय रायफल शूटिंग स्पर्धेचा मंगळवारी थाटात समारोप झाला. यावेळी १८ विजेता स्पर्धकांवर सुवर्णांचा वर्षाव झाला. या स्पर्धेत कोल्हापूर प्रथम, मुंबई द्वितीय तर पुणे संघ तृतीय क्रमांकावर राहिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यातील ४०० शूटर्सनी रायफल शूटिंगमध्ये उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन केले. यामध्ये कोल्हापूर संघाने सर्वाधिक गुण मिळवून ८ सुवर्ण प्राप्त केले असून मुंंबई संघाने ४ , पुणे संघाने २, क्रीडा प्रबोधिनीने २, औरगांबादने २ तर नाशिकने १ अशी सुवर्ण पदके पटकावली.
कोल्हापूरने मारली बाजी
अमरावती : संचालन, आभार प्रदर्शन प्रदीप शेटीये यांनी केले. समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कॅप्टन अजाबराव तेलगोटे, आंतरराष्ट्रीय खेळाडू विश्वजित शिंदे, महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे तांत्रिक अधिकारी जयंत साळवे, अमरावती जिल्हा रायफल असोसिएशनचे सचिव सुनील खराटे, वीर शूटिंग अकादमीचे अमोल चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, अचलपूर तालुका क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, नाशिक क्रीडा विभाग प्रशिक्षक नाना देशमुख, पुणे क्रीडा प्रबोधिनीचे चरटे, अकोला रायफल शूटिंग असोसिएशनचे प्रशांत पावडे, नाशिकच्या प्रिया सिरसाट, कविता काबंळे, अमरावतीचे शुभम मारोटकर, जळगावचे दीक्षांत जाधव, नागपूरचे अनिल पांडे उपस्थित होते.