१७,३४८ कोरोनायोद्ध्यांना दुसऱ्या डोजची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST2021-05-16T04:12:23+5:302021-05-16T04:12:23+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्याने १७ हजार ३४८ कोरोनायोद्ध्यांना अद्याप लसीच्या दुसऱ्या डोजची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात ...

१७,३४८ कोरोनायोद्ध्यांना दुसऱ्या डोजची प्रतीक्षा
अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्याने १७ हजार ३४८ कोरोनायोद्ध्यांना अद्याप लसीच्या दुसऱ्या डोजची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात १८,५१८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोज घेतल्यावर १२,४५२ जणांनीच दुसरा डोज घेतला आहे. याशिवाय फ्रंटलाईन वर्करमध्ये २१,९०९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पहिला डोज घेतल्यानंतर ११,४२८ जणांनीच दुसरा डोज घेतला आहे. यापैकी अनेकांची दुसऱ्या डोजची मुदतदेखील संपलेली आहे.
बॉक्स
४५ वर्षांवरील १,५६,५५० वेटिंगवर
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील २,२३,१७५ नागरिकांनी लसीचा पहिला डोज व ६६,६२५ नागरिकांनी दुसरा डोज घेतला. त्यामुळे या वयोगटातील १,५६,५५० नागरिकांना दुसरा डोजची प्रतीक्षा आहे. याही वर्गाकरिता लसींचा तुटवडा हेच प्रमुख कारण ठळकपणे पुढे आले आहे.
बॉक्स
दोन्ही लसींचा तुटवडा
जिल्ह्यात आतापर्यंत कोविशिल्डचे ३,१३,०८० व कोव्हॅक्सिनचे ७३,१९० डोज प्राप्त झाले. यातून आतापर्यंत ३,७२,४४७ डोज नागरिकांना देण्यात आले. या दोन्ही लसींचा तुटवडा असल्याने १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवून त्यापुढील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
पाईंटर
आरोग्य कर्मचारी : (पहिला डोज १८,५१८, दुसरा १२४५२)
फ्रंट लाईन वर्कर : ( पहिला डोज २१,९०९, दुसरा ११,४२८)
१८ ते ४४ वयोगट : (पहिला डोज १८,३५३, दुसरा ०७)
४५ ते ५९ वयोगट : ( पहिला डोज ९७,५८९, दुसरा १९,९६२)
६० वर्षांवरील : ( पहिला डोज २,८१,९५५, दुसरा ९०,४९२)