जिल्ह्यात १७० जैविक विविध समित्यांचे गठन

By Admin | Updated: September 26, 2015 00:05 IST2015-09-26T00:05:28+5:302015-09-26T00:05:28+5:30

निसर्गाचा समतोल, प्रदूषणमुक्त गाव आदीविषयी वनविभागाद्वारा जिल्ह्यात १७० जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या.

170 biological committees formed in the district | जिल्ह्यात १७० जैविक विविध समित्यांचे गठन

जिल्ह्यात १७० जैविक विविध समित्यांचे गठन

अमरावती : निसर्गाचा समतोल, प्रदूषणमुक्त गाव आदीविषयी वनविभागाद्वारा जिल्ह्यात १७० जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या. या समित्यांना जैविक विविधतेबाबत तांत्रिक मार्गदर्शन व पूर्वप्रशिक्षणाची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत २८ गावांतील समित्यांना विकास कामांसाठी प्रत्येकी २० हजारांचा निधी वनविभागाद्वारा वितरित करण्यात आला आहे.
जैविक विविधतेची जिल्हास्तरीय बैठक २२ मे २०१५ रोजी पार पडली होती. या बैठकीमध्ये ग्रामीण पातळीवर जैविक विविधता समित्यांचे गठन करण्याचे ठरले होते. त्यानुसार जिल्ह्यात जैवविविधता मित्रमंडळ व वनराई या समन्वय संस्थेच्या माध्यमातून १७० ग्रामपंचायतींमध्ये तसेच चांदूरबाजार या एकमेव पंचायत समितीमध्ये जैविक विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यासंदर्भात १६ सदस्यीय समितीची बैठक २१ सप्टेंबर रोजी उपवनसंरक्षक कार्यालयात पार पडली.
अमरावती तालुक्यात १४ ग्रामपंचायतींमध्ये समिती स्थापित करण्यात आली आहे. भातकुलीत समिती स्थापित केली आहे. तसेच २ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० हजारांचा निधीदेखील वितरित करण्यात आला आहे. भातकुली ३१ ग्रामपंचायतींमध्ये समितीचे गठन करून ३ समितींना निधी मिळाला आहे. मोर्शी तालुक्यात २१ ग्रामपंचायतींमध्ये समिती गठित करण्यात आल्या आहेत. वरुड तालुक्यात २०, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १७, तिवसा तालुक्यात १६, चांदूरबाजार तालुक्यात ५०, अशा एकूण १७० ग्रामपंचायतींमध्ये समित्या गठित केल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 170 biological committees formed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.