शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गळा आवळून १७ वर्षीय युवकाचा खून; आजी, आजोबा, मावशीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 11:52 IST

आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. आर्थिक कारणावरून नातवाची हत्या करण्यात आली.

ठळक मुद्देमोर्शी तालुक्यातील राजूरवाडी येथील घटना

मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील राजूरवाडी येथे एका १७ वर्षीय युवकाचा मृतदेह तारेच्या कंपाऊंडजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्याचा गळा आवळून खऊन करण्यात आल्याचे मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास उघड झाले. याप्रकरणी आजोबा, आजी व मावशीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली. मयूर राजेश लोहे (१७, रा. राजुरवाडी) असे मृताचे नाव आहे. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. आर्थिक कारणावरून नातवाची हत्या करण्यात आली.

मयूर हा राजुरवाडी येथे आईचे वडील असलेल्या आजोबा व आजींकडे राहत होता. त्याचे वडील नागपूर येथे राहतात. दरम्यान, २४ मे रोजी मयूर लोहे याचा मृतदेह गावातीलच भारतीय विद्यालयाच्या तारेच्या कंपाऊंडजवळ दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. तेथील पोलीस पाटील अतुल बोंडे यांनी याप्रकरणी शिरखेड पोलिसात फिर्याद नोंदविली. मोर्शीचे पोलीस उपविभागीय अधिकारी नीलेश पांडे, शिरखेडचे ठाणेदार हेमंत कडुकार व त्यांची अधिनस्त पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाली. या तरुण मुलाची गळा आवळून हत्या झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.

लगेच शिरखेड पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. तथा शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी श्वानपथकालासुद्धा पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे, शिरखेडचे ठाणेदार हेमंत कडुकार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. मनोज टप्पे, नीलेश देशमुख, रामेश्वर इंगोले, प्रभाकर चव्हाण, समीर मानकर, विजय टेकोडे, रमेश नेवारे यांनी घटनास्थळ गाठून मृताचा पंचनामा केला. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवून मयूर याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी त्याचा आजोबा गणपतराव उपासराव कंठाळे, मृताची आजी व मावशीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

मयूरची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या आजोबासह दोन महिलांना अटक करण्यात आली.

नीलेश पांडे, एसडीपीओ, मोर्शी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmorshi-acमोर्शीDeathमृत्यू