१७ तहसीलदार, ७० नायब तहसीलदार, ७ उपजिल्हाधिकारी एकदिवसीय रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:50+5:302021-02-05T05:31:50+5:30
(फोटो/ वॉटस अॅपवर) अमरावती : यवतमाळ जिल्ह्यात २३ जानेवारीला उमरखेड नायब तहसीलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर रेतीमाफियाने ...

१७ तहसीलदार, ७० नायब तहसीलदार, ७ उपजिल्हाधिकारी एकदिवसीय रजेवर
(फोटो/ वॉटस अॅपवर)
अमरावती : यवतमाळ जिल्ह्यात २३ जानेवारीला उमरखेड नायब तहसीलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर रेतीमाफियाने चाकुहल्ला केला. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपींना अटक करुन कारवाई करण्याचे मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले.
आंदोलनात जिल्ह्यातील १७ तहसीलदार, ७० नायब तहसीलदार व सात उपजिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी सहभाग नोंदविला व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व तहसीलदार गजेंद्र मालठाणे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, राम लंके, तहसीलदार रवि महाले, अभिजित जगताप, उमेश खोडके, राजाभाऊ वानखडे यांच्यासह नायब तहसीलदार व महसूूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो कॅप्शन/ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देताना गजेंद्र मालठाणे, नितीन व्यवहारे, राम लंके, रणजित भोसले आदी.)