मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी १७ लाख शस्त्रक्रिया, तात्याराव लहानेंकडे जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 10:34 PM2017-12-30T22:34:39+5:302017-12-30T22:34:47+5:30

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशनअंतर्गत येत्या १८ महिन्यांमध्ये राज्यातील १७ लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

17 lakhs surgeries for cataract-free Maharashtra, Tatya Rao will have responsibility for small children | मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी १७ लाख शस्त्रक्रिया, तात्याराव लहानेंकडे जबाबदारी 

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी १७ लाख शस्त्रक्रिया, तात्याराव लहानेंकडे जबाबदारी 

Next

अमरावती : मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशनअंतर्गत येत्या १८ महिन्यांमध्ये राज्यातील १७ लाख रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मिशन यशस्वितेची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने या ध्येयवेड्या डॉक्टरांवर सोपविण्यात आली आहे.
‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मिशन २०१९’ हे मिशन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने संयुक्तपणे राबवावे. हे मिशन १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत राहील व यात आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाची अतिरिक्त मदत घ्यावी, असे निर्देश शासनाचे उपसचिव सुरेंद्र चानकर यांनी दिले आहेत. 
देशात मोतीबिंदुमुळे येणाºया अंधत्वाची विकृती मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यात महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांमध्ये ही समस्या अधिक आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असला तरी समस्येवर पूर्णपणे नियंत्रण राखता आलेले नाही. त्या पार्श्वभूमिवर ऑगस्ट २०१९ पर्यंत महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला आहे. या मिशनचे राज्यस्तरीय समन्वयक म्हणून डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभाग या मिशनसाठी नेत्र शल्यचिकित्सक, तंत्रज्ञ व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संस्था, सर्व डॉक्टर्स व इतर मनुष्यबळाने मिशन समन्यवकांना संपूर्ण सहकार्य करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचा संकल्प
महाराष्टlत मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये जवळपास १७ लाखांचा अनुशेष आहे. यातील सुमारे पाच लाख मोतीबिंदू हे परिपक्वहोऊन गेले असून त्यातील बहुतेक जण वृद्ध व ग्रामीण भागातील आहेत. आरोग्याच्या योजनांचा आढावा घेताना ही बाब लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धपातळीवर ‘मोतीबिंदू’मुक्त महाराष्टची योजना आखण्यास सांगितले होते. त्यानुसार या संकल्प यज्ञात १७ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतील. मोफत चष्मे वाटपही होईल.
 

Web Title: 17 lakhs surgeries for cataract-free Maharashtra, Tatya Rao will have responsibility for small children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.