सात्त्विक इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकाकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: May 27, 2015 00:15 IST2015-05-27T00:15:47+5:302015-05-27T00:15:47+5:30

गुंतवणुकीच्या माध्यमातून ११ लाखांनी फसवणूक करणाऱ्या सात्विक इन्व्हेस्टमेंट कंपनी संचालकाकडून १६ लाख १५ ....

17 lakhs seized from Sattvik Investment Company's director | सात्त्विक इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकाकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

सात्त्विक इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकाकडून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : गुंतवणुकीच्या माध्यमातून ११ लाखांनी फसवणूक करणाऱ्या सात्विक इन्व्हेस्टमेंट कंपनी संचालकाकडून १६ लाख १५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केला.
कॉटन ग्रिन कॉलनीतील रहिवासी रमेश मधुकर कोलते (५८) व पांडुरंग मारोती नारखडे यांनी सात्विक इन्व्हेस्टमेंट कंपनीत ११ लाखांची गुंतवणूक केली होती. मात्र, त्यांचे पैसे परत देण्यात आले नव्हते. याबाबत त्यांनी १२ मे रोजी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी संचालक आरोपी अमोल जगन्नाथ ढाके (४०, रा. भरतनगर, नागपूर), एजन्ट कृष्णा व एका इसमाविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यावर पोलिसांनी अमोल ढाके याला नागपूर येथील कारागृहातून प्रोड्यूस वाँरटवर ताब्यात घेतले. त्यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. आरोपी अमोल ढाकेने नागरिकांच्या पैशांतून इर्न्व्हटर खरेदी करून विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्याने नागपूर येथील भाऊ रामचंद्र ढाके यांच्या कारखान्यात इन्व्हर्टर ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस निरीक्षक गणेश अणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी, राजू शेंडे, विनोद धुळे, एएसआय कदीर, राजेश अंबुलकर, मनोज उसरडे, ईश्वर चक्रे व महिला पोलीस अस्मिता यांचे पथक नागपूरला रवाना झाले होते. पोलिसांनी कारखान्यात ठेवलेले १६ लाख ८५ हजार २५० रुपयांचे २४० इन्व्हर्टर जप्त केले आहे. हा माल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात प्रस्ताव आला आहे.

Web Title: 17 lakhs seized from Sattvik Investment Company's director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.