१७ गावांना सतर्कतेचा इशारा
By Admin | Updated: June 23, 2015 00:43 IST2015-06-23T00:43:32+5:302015-06-23T00:43:32+5:30
दोन जिल्ह्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून...

१७ गावांना सतर्कतेचा इशारा
बगाजी सागरचे दरवाजे उघडणार : ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा
धामणगाव रेल्वे : दोन जिल्ह्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरणाची पातळी ८६ से़मी़ने वाढताच पुढच्या तीन दिवसांत धरणाचे दरवाजे उघडणार आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धामणगाव तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़
अमरावती जिल्ह्यातील सात व वर्धा जिल्ह्यातील २९ गावांचे पुनर्वसन करण्यात आले़ ३१ दरवाजे असलेल्या या धरणाची जलसंचय क्षमता २५३़१७ दशलक्ष घनमीटर इतकी आहे़ सध्या या धरणात ७३़७ द.ल.घ.मी. पाणी आहे़ गेल्या २४ तासांत या धरण क्षेत्रात ५० मि.मी. पाऊस पडला. चार दिवसांत २८ सें.मी.ने धरणाची पातळी वाढली आहे़ जलपातळी ८५ से़मी़ने वाढल्यास धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील, असे निम्न लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही़व्ही गावंडे यांनी सांगितले़ वर्धेच्या काठावरील तालुक्यातील १७ गावांना कोतवालामार्फत दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती धामणगावाचे तहसीलदार श्रीकांत घुगे यांनी दिली लोअर वर्धा प्रकल्पाचे सहायक अभियंता गोडे, बाजारे, शाखा अभियंता पांढरे, रायसे काकपुरे बगाजी सागरातून पाण्याच्या विसर्गाकडे लक्ष देत आहेत.