लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारपर्यंत १६१ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली असून ६६१ उमेदवार रिंगणात कायम आहे. २२ प्रभागांतून ८७ सदस्य निवडीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. शनिवार, ३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे. त्याकरिता सात ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी नेमण्यात आले आहेत.
या निवडणुकीत बडनेरा झोन कार्यालयात सर्वाधिक १२६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून २३ जणांनी माघार घेतली आहे, तर सर्वात कमी नामनिर्देशन पत्र जुने तहसील कार्यालय, मेन पोस्ट ऑफिसजवळ अमरावती येथे सादर करण्यात आले असून येथे १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. शनिवार, उमेदवारांना अधिकृतपणे निवडणूक चिन्हाचे वाटप झाल्यानंतर प्रचाराला प्रारंभ होईल, असे संकेत आहेत.
निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्टझोन रिंगणात माघारउत्तर झोन क्रमांक रामपुरी कॅम्प, महापालिका कार्यालय ९७ १९नवे तहसील कार्यालय, सांस्कृतिक भवनसमोर मोर्शी रोड १०० २८मध्य झोन क्रमांक ३ राजापेठ महापालिका कार्यालय ९४ २६पूर्व झोन क्रमांक ३ दस्तुरनगर महापालिका कार्यालय १०८ २३महापालिका शिक्षण विभाग कार्यालय अंबापेठ ८३ २८जुने तहसील कार्यालय, मेन पोस्ट ऑफिसजवळ अमरावती ५३ १४दक्षिण झोन क्रमांक ४ महापालिका कार्यालय नवीवस्ती बडनेरा १२६ २३
Web Summary : 161 candidates withdrew from Amravati Municipal Corporation elections. 661 candidates remain for 87 seats across 22 wards. Polling is on January 15th, counting on January 16th. Symbol allocation is scheduled for Saturday, followed by campaign commencement.
Web Summary : अमरावती महानगरपालिका चुनाव में 161 उम्मीदवारों ने नाम वापस लिए। 22 वार्डों में 87 सीटों के लिए 661 उम्मीदवार मैदान में हैं। मतदान 15 जनवरी को, मतगणना 16 जनवरी को होगी। शनिवार को चुनाव चिन्हों का आवंटन होगा, जिसके बाद प्रचार शुरू होगा।