वरूडमध्ये १६० वराहांवर विषप्रयोग
By Admin | Updated: March 23, 2017 00:02 IST2017-03-23T00:02:36+5:302017-03-23T00:02:36+5:30
शहरातील विविध भागात एकाच दिवशी १६० वराहांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

वरूडमध्ये १६० वराहांवर विषप्रयोग
खळबळ : ४ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान
वरूड : शहरातील विविध भागात एकाच दिवशी १६० वराहांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यावराहांवर विषप्रयोग केल्याचे सांगण्यात येत असून यामुळे वराह मालकाचे ४ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे
स्थानिक सिख मोहल्ल्यातील जर्नेलसिंग भावे आणि गोदेसिंग भावे यांचा वराहपालनाचा व्यवसाय आहे. मृत सर्व १६० वराह त्यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात येते. शहरातील बाजार समितीचे संत्रा मार्केट, देशमुखपुरा व गोठाण परिसरामध्ये मंगळवारी वराह मृतावस्थेत मंगळवारी आढळून आलेत. मृत वराहांना नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने ट्रक्टरमध्ये भरून नेले. यामध्ये वराहमालकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. वराहांवर विषप्रयोग केल्याची चर्चा आहे. (तालुका प्रतिनीधी)