मोटरपंपाच्या बटनला चिकटला १६ वर्षांचा मुलगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:19+5:302021-09-21T04:15:19+5:30

मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील धामणगाव काटपूर येथील एका १६ वर्षीय मुलाचा वीजप्रवाहाच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच ...

A 16-year-old boy stuck to the button of a motor pump | मोटरपंपाच्या बटनला चिकटला १६ वर्षांचा मुलगा

मोटरपंपाच्या बटनला चिकटला १६ वर्षांचा मुलगा

मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील धामणगाव काटपूर येथील एका १६ वर्षीय मुलाचा वीजप्रवाहाच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार, आनंद अरविंदराव आवारे असे मृताचे नाव आहे. या मुलाने पाण्याचा मोटरपंप सुरू करण्यासाठी बटन दाबली. यावेळी अचानक शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे हा मुलगा अक्षरशः चिकटला. बटन दाबले ते बोटसुद्धा भाजले गेले. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ त्याला मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. आनंदला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता, या ठिकाणी स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने नातेवाइकांनी व उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरणसुद्धा निर्माण झाले होते. त्याचा मृतदेह तूर्तास शवागारात ठेवण्यात आला आहे.

Web Title: A 16-year-old boy stuck to the button of a motor pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.