१६ सदस्यपदे रिक्त, ४३४ अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:18+5:302021-01-08T04:36:18+5:30
अमरावती : एकही उमेदवारी अर्ज नसल्याने १६ सदस्यपदे रिक्त राहिली आहेत. याशिवाय १२ ग्रामपंचायती व ४३४ सदस्य बिनविरोध निवडून ...

१६ सदस्यपदे रिक्त, ४३४ अविरोध
अमरावती : एकही उमेदवारी अर्ज नसल्याने १६ सदस्यपदे रिक्त राहिली आहेत. याशिवाय १२ ग्रामपंचायती व ४३४ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ४,४५२ सदस्यपदांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजनांची खबरदारी घेतली जात आहे.
जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये १२ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्याने, प्रत्यक्षात ५४१ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदसावंगी, सातरगाव, पिंपरी निपाणी, सुलतानपूर, तिवसा तालुक्यात ठाणाठुणी, चांदूर रेल्वे तालुक्यात येरड, धामणगाव रेल्वे तालुक्यात काशीखेड, निंबोरा बोडखा, मोर्शी तालुक्यात लिहिदा, पाळा, चांदूर बाजार तालुक्यातील वडुरा व अचलपूर तालुक्यात दर्याबाद या ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत.
निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे दर्यापूर तालुक्यात पाच, अचलपूर चार व धारणी तालुक्यात सात अशा एकूण १६ जागा प्रभाग रिक्त असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले. ४३४ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यातील ३०, भातकुली ३६, नांदगाव खंडेश्वर ५६, दर्यापूर २२, अंजनगाव सुर्जी ३२, तिवसा १५, चांदूर रेल्वे १६, धामणगाव रेल्वे २६, अचलपूर ३८, चांदूर बाजार ४१, मोर्शी ३४, वरुड १०, धारणी ४३ व चिखलदरा तालुक्यातील ३५ सदस्यांचा समावेश आहे.
बॉक्स
४,४५२ जागांसाठी निवडणूक
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ४,४५२ सदस्यपदांसाठी आता १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ३८६, भातकुली २७६, नांदगाव खंडेश्वर ३६३, दर्यापूर ४१७, अंजनगाव सुर्जी २८०, तिवसा २४६, चांदूर रेल्वे २१९, धामणगाव रेल्वे ४३१, अचलपूर ३६४, चांदूर बाजार ३४०, मोर्शी ३१४, वरुड ३६९, धारणी २८३ व चिखलदरा तालुक्यात १६४ जागांचा समावेश आहे.