जिल्हास्तरावर १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Updated: May 22, 2015 00:36 IST2015-05-22T00:36:41+5:302015-05-22T00:36:41+5:30
जिल्हा परिषदेत बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. गुरुवार २१ मे रोजी मागील वर्षीच्याच परिपत्रकानुसार जिल्हा स्तरावरील १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात.

जिल्हास्तरावर १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
अमरावती : जिल्हा परिषदेत बदल्यांचा मौसम सुरू झाला आहे. गुरुवार २१ मे रोजी मागील वर्षीच्याच परिपत्रकानुसार जिल्हा स्तरावरील १६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. यामध्ये प्रशासकीय, विनंती, आपसीच्या कारणावरुन बदल्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशनाद्वारे या बदल्या करण्यात आल्या. मागील वर्षी १५ मे रोजी ग्रामविकास मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसर या बदल्या करण्यात आल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च घटक असलेली मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेमधील बदल्यांचा मौसम म्हणून नेहमीच चर्चेचा व प्रसंगी वादाचा विषय ठरला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्हा स्तरावर झालेल्या बदल्यांनाही गालबोट न लागता बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय बदलीसाठी किमान १० वर्षांचा तर विनंतीसाठी ५ वर्षांचा निकष लावण्यात आला आहे. जि.प. सभागृहात प्रोजेक्टरद्वारे बदल्यांबाबतचे चित्र स्पष्ट करण्यात आले. यावेळी सीईओ अनिल भंडारी, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे विभागप्रमुख आणि अध्यक्ष सतीश उईके, सभापती उपस्थित होते. गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये प्रामुख्याने पशुसंवर्धन, कृषी आणि ग्रामीण पाणीपुरवठा या तीन विभागातील जिल्हास्तरीय बदल्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)