चांदूर बाजार तालुक्यात १८ दिवसांत १५६ कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST2021-03-01T04:15:04+5:302021-03-01T04:15:04+5:30

चांदूर बाजार : तालुक्यातील कोरोना संक्रमितांची संख्या १० फेब्रुवारीपासून वाढीस लागली. तालुक्यात १८ दिवसांत १५६ कोरोना रुग्णांची नोंद ...

156 corona patients in 18 days in Chandur Bazar taluka | चांदूर बाजार तालुक्यात १८ दिवसांत १५६ कोरोना रुग्ण

चांदूर बाजार तालुक्यात १८ दिवसांत १५६ कोरोना रुग्ण

चांदूर बाजार : तालुक्यातील कोरोना संक्रमितांची संख्या १० फेब्रुवारीपासून वाढीस लागली. तालुक्यात १८ दिवसांत १५६ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सदर आकडेवारी १० ते २७ फेब्रुवारी या कालावधीतील आहे. सदर रुग्णसंख्या तालुका प्रशासनाची असली तरी प्रत्यक्ष आकडेवारी यामध्ये मोठी तफावत आढळून येते.

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार, सध्या तालुक्यात १५६ पैकी १४२ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. पैकी काही रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. काही खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. १२ रुग्ण होम आयसोलेट आहेत. १० ते २७ फेब्रुवारी दरम्यान तालुक्यात एकही कोरोनाग्रस्त दगावला झाला नाही. ती प्रशासनासाठी जमेची बाजू आहे. कोरोना प्रादुर्भावाचा रेशो दरदिवशी साडेआठ असा आहे. ही तालुक्यासाठी गंभीर बाब आहे. तेव्हा नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोट

तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना रुग्ण १५६ असले तरी मृतांचा आकडा निरंक आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. नागरिकांनी ‘मी जबाबदार’ या भावनेतून आपले, कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे.

- ज्योत्स्ना भगत, तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: 156 corona patients in 18 days in Chandur Bazar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.