घरातून १५ हजारांची सोन्याची पोत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:08+5:302021-01-08T04:38:08+5:30
अमरावती : एका महिलेने घरात पर्समध्ये सोन्याच्या डोरल्याची पोत ठेवून ती नातेवाईकांच्या घरी गेली असता, ती पोत अज्ञात ...

घरातून १५ हजारांची सोन्याची पोत चोरी
अमरावती : एका महिलेने घरात पर्समध्ये सोन्याच्या डोरल्याची पोत ठेवून ती नातेवाईकांच्या घरी गेली असता, ती पोत अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना प्रशांतनगर येथे २ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
फिर्यादी नंदाबाई वसंतराव मुंदे (५६, रा. शेगाव नाक्याजवळ, अनंत विहार कॉलनी) यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविची कलम ३८० अन्यवे गुन्हा नोंदविला.
फिर्यादी महिला २ जानेवारीला प्रशांत नगर येथे आईच्या घरी आली. तिने जुनी तुटलेली पोत पर्समध्येच ठेवून दिली. त्यानंतर त्या किशोरनगरातील मामीकडे गेल्या. परत आल्यानंतर नातेवाईकांना विचारले असता पोत मिळून आली नाही. ती अज्ञात आरोपीने चोरून नेली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.