शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट 'समृद्धी'वर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत राहणार 'वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:09 IST

चोरट्यांनो सावधान : अपघातस्थळांचे लोकेशन कळणार, सुसाट वाहन चालकांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या दळणवळणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागपूरपासून मुंबईपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. जवळपास १५०० कॅमेरे समृद्धी महामार्गावर लावण्यात येणार आहेत. नागपूर ते मुंबई समुद्धी महामार्ग गेम चेंजर ठरला असून, ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गावर आता सुविधा निर्माण करण्यासाठी काम केले जात आहे.

सध्या समृद्धी महामार्गावर नागपूर ने जालना, शिर्डी, नाशिक व ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. १२० प्रतिकिमी तास कार, तर जड वाहनाकरिता ८० किमी प्रतितास वेग मर्यादा दिलेली आहे. हा महामार्ग अत्यंत गुळगुळीत आणि गतिरोधक नसलेला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. कारण महिन्याला ३ लाख लहान-मोठी वाहने या महामार्गावर धावत असून, माल वाहतूक करणाऱ्या लॉरीज आता या समृद्धी महामार्गाचा उपयोग करताना दिसून येतात.

दिल्लीच्या कंपनीला कंत्राट

नागपूर ते मुंबईदरम्यान समृद्धी महामार्गावर एकूण १५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. अत्यंत प्रभावी सीसीटीव्ही कॅमेरे एका बाजूने ५०० मीटर आणि दुसरा बाजूने ५०० मीटर क्षेत्र व्यापणार हे कॅमेरे बसविण्याचे काम दिल्ली येथील एनसीसी या कंपनीकडे देण्यात आले आहे. उंचावरून ५०० मीटर सरळ आणि २०० मीटर बाजूला नजर ठेवणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात समृद्धीवर कंट्रोल रूम तयार करणार असून, यामध्ये 'एआय'चा वापर होणार आहे. मुंबई हे प्रमुख कंट्रोल रूम असेल.

सीसीटीव्ही कॅमेरे लागण्यास सुरुवात

  • समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या वाहनांचा वेग तपासण्यासाठी नव्हे तर समृद्धी महामार्गावर अपघात घडल्यास कंट्रोल रूम तत्काळ अपघातस्थळाचे ठिकाण दाखविणार असून, अपघातस्थळी लवकर मदत मिळणार आहे.
  • कारण, सध्या अपघात झाल्यावर वाहनधारकांना वाहन नेमके स्थळ सांगताना अडचण होते. कारण, मध्ये कोणतेही गाव नसते आणि किमी ऐवजी चेनेज यावर स्थळ ठरविले जाते. जे केवळ 'एमएसआरडी'ला कळते. समृद्धी महामार्गावर नागपूर ते वाशिमदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : 1500 CCTV Cameras Monitor Samruddhi Expressway from Nagpur to Mumbai

Web Summary : Samruddhi Expressway gets 1500 CCTV cameras from Nagpur to Mumbai. Aim: monitor vehicles, reduce accidents. Delhi's NCC handles installation with AI-powered control rooms for quick accident response.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गcctvसीसीटीव्हीNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणAmravatiअमरावतीnagpurनागपूरMumbaiमुंबई