शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील १५० गावे अजूनही बस सेवेपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 13:37 IST

मेळघाटातील १५० गावांत आजही महामंडळाची एसटी जात नाही; करावा लागतो जीवावर बेतणारा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही मेळघाटातील २१ गावांमध्ये विद्युत पुरवठा नाही. ४० गावांचा रस्ता नाही तर दीडशेच्यावर गावांमध्ये अजूनही राज्य परिवहन मंडळाची एसटीदेखील जात नाही. तर पंधरापेक्षा अधिक गावांमध्ये मोबाइल रेंजची सुविधा नाही. अशाही परिस्थितीत लोकशाहीवर विश्वास ठेवीत आदिवासींनी २६ एप्रिल रोजी सर्वाधिक शुक्रवारी मतदानाचा आपला अधिकार बजावला. कुपोषणाचा कलंक आणि त्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या विकास योजनांचा पाऊस पाडल्याचे सांगितले जात असले तरी मेळघाटातील वास्तव अजूनही भयावह आहे. अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने गावापर्यंत महामंडळाची बस, विद्युत पुरवठा, रस्ते आणि मोबाइल रेंजपासून आदिवासी वंचितच आहेत.

अनेक गावे मोबाइल रेंजविनामध्यप्रदेश सीमेवर वसलेल्या मेळघाटच्या हतरू, जारीदा, बैरागड पट्ट्यात मोबाइल रेंज नसल्याचे वास्तव आहे. त्यामध्ये चोबिता, लाखेवाडा, बोधू, खारी, चुनखडी, कारंजखेडा, सर्वांखेडा, चिलाटी, सिमोरी, कुही रुईपठार, हिल्डा, मारीता अशी अनेक गावे मोबाइल नेटवर्कविना आहेत. आदिवासी युवक मोठ्या प्रमाणात शिक्षित झाले असून त्यांच्याकडेसुद्धा अँड्रॉइड मोबाइल आहेत. जगात काय सुरू आहे आणि शिक्षणाचे स्रोत ते आता इंटरनेटद्वारे बघण्याची अपेक्षा ठेवत असताना अनेक गावांमध्ये मोबाइलची रेंज नसल्याचे चित्र आहे.

या २१ गावांत अंधारचमेळघाटातील रक्षा कुंड, रंगुबेली, खोपमार, चोपन, ढोकडा, खामदा, किन्हीखेडा या धारणीतील तापी नदीच्या किनाऱ्यावरील तर खुटीदा सुमिता, मारिता, सरोवरखेडा, रायपूर, बोराट्या, माखला, माडीझडप, चुनखडी, नवलगाव, बिच्छूखेडा अशी एकूण २१ गावे आजही विद्युत पुरवठ्याअभावी अंधारातच आहे. विकासाचा दिवा केव्हा लागणार हे आजही अनुत्तरीत आहे.

टपावरचा प्रवास, पर्याय नाहीमेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांमध्ये रस्ताच नाही, असला तरी बस जात नाही. परिणामी खासगी वाहनांशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नाही. आजही चारचाकीच्या टपावर बसूनच जीवघेणा प्रवास करीत त्यांना तालुक्याच्या ठिकाणी व बाजारात खरेदीसाठी जावे लागते.

 

टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावतीBus Driverबसचालक