१५ व्यक्ती कोरोनामुक्त; जिल्ह्याला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:01:18+5:30

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहतील. रुग्णालयात सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले.

15 persons coronal free; Consolation to the district | १५ व्यक्ती कोरोनामुक्त; जिल्ह्याला दिलासा

१५ व्यक्ती कोरोनामुक्त; जिल्ह्याला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोविड रूग्णालयात दाखल संक्रमित १५ व्यक्तींचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रविवारी घरी सोडण्यात आले. यावेळी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून आणि टाळ्या वाजवून स्वागत केले. जिल्ह्यात ४० तासानंतर एकाही नव्या रुग्णाची नोंद न झाल्याने रविवारी या दोन्ही घटनांनी अमरावतीकरांना दिलासा मिळाला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहतील. रुग्णालयात सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले. कुणाही नागरिकांनी कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसली की तत्काळ रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, अशी भावना या कोरोनामुक्त झालेल्या या व्यक्तींनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा शल्य चिकित्सकांनी या सर्व व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. उपचारादरम्यान रुग्णांनी सर्व स्टाफशी चांगले सहकार्य केले. स्वत:चे मनोधैर्य कायम ठेवले. आज ते बरे होऊन घरी परतत आहे, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या काळात नागरिकांनीही दक्षतेचे पालन करावे. कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ संपर्क साधावा, असे आरोग्य यंत्रणेद्वारा करण्यात आले.

आतापर्यत २१ संक्रमित व्यक्ती उपचारानंतर बरे
१५ ही कोरोनामुक्त क्लस्टर हॉटस्पॉटमधील

रविवारी कोरोनामुक्त करण्यात आलले १० पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे. कमेला ग्राऊंड येथील ३ महिला व १ पुरुष अशा चौघांचा समावेश आहे. हैदरपुरा येथील २ पुरुष व्यक्तींचा त्यात समावेश आहे. बडनेरा येथील १ पुरुष व १ महिलेचा अशा दोघांचा समावेश आहे. तारखेडा येथील ३ पुरुष व्यक्तींचा त्यात समावेश आहे. खोलापुरी गेट येथील २ पुरुष व एका महिलेचा अशा तिघांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे चेतनदास बगिचा येथील १ पुरुषाचा कोरोनामुक्तांमध्ये समावेश आहे.

डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रूग्णसेवा देत आहेत. महानगरातील १५ नागरिक बरे होऊन परतत असल्याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही घटना दिलासा देणारी आणि मनोबल उंचावणारी आहे.
- डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: 15 persons coronal free; Consolation to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.