शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

शेतकºयांना १५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:15 IST

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाफेडच्या केंद्रांसाठी आॅनलाइन नोंदणी होत असताना प्रत्यक्षात खरेदी सुरू नसल्याने शेतकºयांना बाजार समित्यांकडे धाव घ्यावी लागली. यंदाच्या हंगामात २३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख ९२ हजार १५९ क्विंटल सोयाबीन आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने व्यापाºयांना विकले गेल्याने शेतकºयांना किमान १५ कोटींचा फटका बसला आहे.आर्थिक ...

ठळक मुद्देडोळ्यादेखत लूट : दोन लाख क्विंटल खुल्या बाजारात

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाफेडच्या केंद्रांसाठी आॅनलाइन नोंदणी होत असताना प्रत्यक्षात खरेदी सुरू नसल्याने शेतकºयांना बाजार समित्यांकडे धाव घ्यावी लागली. यंदाच्या हंगामात २३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख ९२ हजार १५९ क्विंटल सोयाबीन आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने व्यापाºयांना विकले गेल्याने शेतकºयांना किमान १५ कोटींचा फटका बसला आहे.आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खुल्या बाजारात सोयाबिनची मोठ्या प्रमाणात विक्री केली. विक्रीसाठी येणाºया सोयाबीनचा ओघ अद्यापही तसाच कायम आहे. यंदा सोयाबीनला तीन हजार ५० रुपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. बाजार समित्यांसह खुल्या बाजारात शेतकºयांच्या निकडीचा खरेदीदारांनी फायदा घेत हमीपेक्षा ५०० ते हजार रुपये प्रतिक्विंटल कमीने खरेदी केल्याने शेतकºयांचे किमान १५ कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. बाजार समितीसह सहकार विभागाचे नियंत्रण व्यापाºयांवर नसल्याने दररोज शेतकºयांची लूट होत असताना कोणाकडूनही जाब विचारला गेला नाही, हे येथे उल्लेखनीय.यंदाच्या हंगामात पेरणीपासूनच पावसाची तूट असल्याने शेतकºयांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसाचा ताण राहिला. त्यातून जे सोयाबीन बचावले त्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. पावसाबाबत अतिसंवेदनशील समजल्या जाणाºया सोयाबीन बहरावर असताना व शेंगा पक्वहोण्याच्या काळात पाऊस न आल्याने शेंगा कमी लागल्या व पोचट राहिल्या. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. यंदाच्या हंगामात उत्पादन खर्चही निघणे कठीण व्हावे, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन नेल्यावर व्यापाºयांनी भाव पाडले.१५ कोटींच्या फटक्याचे गणित२३ आॅक्टोबरला अमरावती बाजार समितीत २३५० ते २५५०, नांदगाव खंडेश्वरला १८०० ते १६००, चांदूर रेल्वे १८०० ते २६५०, मोर्शी १८०० ते २५००, दर्यापूर १६५० ते २६२० व अचलपूर बाजार समितीमध्ये २२०० ते २६५० रूपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. यंदा आधारभूत किंमत ३०५० रूपये असताना जिल्ह्यात सरासरी २२०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला व आतापर्यंत दोन लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याने शेतकºयांना आधारभूत दराच्या तुलनेत किमान १५ कोटींचा तोटा झाला.सोयाबिनची बेभाव विक्रीआॅनलाईन नोंदणी, मात्र खरेदी बंदजिल्ह्यात नाफेडच्या पाच केंद्रांवर साधारणपणे तीन आॅक्टोबरपासून सोयाबीन, तूर, मूग व उडदासाठी शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी सुरू झाली. १६ आॅक्टोबरनंतर या केंद्रांवर फक्त मूग व उडदाची खरेदी सुरू करण्यात आली. यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी असल्याने मूग व उडदाचा पेरणी क्षेत्र कमी आहे. या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र जास्त असताना व सोयाबीनचा हंगाम सुरू असतानासुद्धा शासनाद्वारा खरेदी करण्यात आलेली नाही.ग्रेडर उपलब्ध नसल्याचा केवळ देखावानाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी करण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले. यवतमाळ येथे सोमवारच्या दौºयात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिल्यानंतरही जिल्ह्यात सोयाबीनची खरेदी सुरू झालेली नाही. ग्र्रेडरच उपलब्ध नसल्याचे कारण दर्शवित यंत्रणेद्वारा शेतकºयांची दिशाभूल करण्यात आली. मात्र, गुरूवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा दौरा असल्याने सोयाबीनची खरेदी करण्याचा देखावा यंत्रणेद्वारा सुरू आहे.यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवकयंदाच्या हंगामात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये २३ आॅक्टोबरअखेर १,९२,१६० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये अमरावती बाजार समितीमध्ये १,०६,६८९ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर ४,५४६, चांदूर रेल्वे ५,१०९, चांदूर बाजार ६,७६७, मोर्शी ५,८१२, वरूड २१०, दर्यापूर ३,७८३, अंजनगाव सुर्जी ४,१३०, अचलपूर बाजार समितीमध्ये २,०६७ क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे.