१४३ उमेदवार अपात्र
By Admin | Updated: May 9, 2015 00:32 IST2015-05-09T00:32:54+5:302015-05-09T00:32:54+5:30
जिल्ह्यात सन २०१२-१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच सन २०१४-१५ मध्ये झालेल्या चांदूररेल्वे,

१४३ उमेदवार अपात्र
सन २०१२, २०१४ ची जि.प.-पं.स. निवडणूक : खर्च सादर न केल्याने कारवाई
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यात सन २०१२-१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच सन २०१४-१५ मध्ये झालेल्या चांदूररेल्वे, धामणगाव व तिवसा या तालुक्यांमधील पंचायत समितीची निवडणूक लढविणाऱ्या परंतु विहित मुदतीमध्ये निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या १४३ उमेदवारांवर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई केली आहे.
ही कारवाई झालेल्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे विद्यमान सदस्य नसले तरी ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढविणारे ३१, यावर्षी पंचायत समितीची निवडणूक लढविणारे १०२ उमेदवार तसेच सन २०१४ मधील पंचायत समिती निवडणूक लढविणारे १० उमेदवार अशा एकूण १४३ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ६२ ए (१) अन्वये पाच वर्षांसाठी ही अपात्रतेची कारवाई करण्यात आली. निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर करणे शासनाने बंधनकारक केले आहे. परंतु निवडणूक आटोपल्यानंतर निवडणूक लढविणारे व निवडून येणारे उमेदवार ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. परिणामी निवडणूक खर्च विहीत मुदतीत सादर न केल्याने शासनाकडून कठोर कारवाईचे हत्यार उपसण्यात आले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
जि.प.च्या ३१ उमेदवारांना पाच वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी
पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी आलेल्यांमध्ये मंगरुळ दस्तगीर गटाच्या प्रतिभा घरत, उमा मडावी, देवगाव गटाचे संदीप उईके, रणजीत कोयताडे, सुरेश रंधळे, तळेगाव दशासर गटाच योगेश्वर कवाडे, श्रध्दानंद रामगावकर, हिवरखेड गटाच्या अश्विनी कानफाडे, शिवानी राऊ त, लता साऊ त, माधुरी अजमिरे, राजुरवाडी गटाच्या कल्पना भलावी, विद्या तलांजे, नेरपिंगळाई गटाच्या पद्मा डहाके, रेखा मडके, अंबाडा गटाच्या प्रिती सांकाम, उर्मिला धुर्वे, खल्लार गटाच्या मिनी चव्हाण, येवदा गटाचे मनिराम पवार, पिंपळोद गटाच्या रेखा गावंडे, साऊ र गटाच्या सारिका दाभाडे, वाठोडा शुक्लेश्वर गटाच्या सविता चव्हाण यांचा समावेश आहे.
जि.प.,पं.स. अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
जिल्ह परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला ३ लाख रुपये व पंचायत समिती उमेदवाराला अडीच लाख रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. या उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्याच्या ३० दिवसांच्या आत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.
सन २०१४ मधील पं.स. चे १० उमेदवार अपात्र
सन २०१४ मध्ये चांदूररेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर गणाचे ममता ठाकूर, पळस गणाचे पंंडित गवई, राजुरा गणाच्या पुष्पा काळे, लता बोडखे, जुना धामणगाव गणाचे प्रशांत भगत, अंजनसिंगी गणाचे सुरेश हुडे, धामणगाव तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर गणाच्या बेबी भोयर,चिंचोली गणाच्या प्रतिभा पवार, तळेगाव गणाच्या भाग्यश्री रामगावकर, शेंदुरजना खुर्द गणाचे रविश बिरे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.