स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी १४२ विद्यार्थ्यांची विदेशवारी

By Admin | Updated: June 21, 2016 00:08 IST2016-06-21T00:08:08+5:302016-06-21T00:08:08+5:30

येथील पी.आर. पोटे ग्रुप आॅफ इन्स्ट्यिुशनच्यावतीने ६ ते १२ जुलैदरम्यान १४२ विद्यार्थ्यांचा नि:शुल्क अभ्यास दौरा आयोजित केला आहे.

142 students abroad for civil engineering studies | स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी १४२ विद्यार्थ्यांची विदेशवारी

स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी १४२ विद्यार्थ्यांची विदेशवारी

पोटे इन्स्टिट्युटचा नि:शुल्क उपक्रम : दिलीप निंभोरकर यांची पत्रपरिषदेत माहिती
अमरावती : येथील पी.आर. पोटे ग्रुप आॅफ इन्स्ट्यिुशनच्यावतीने ६ ते १२ जुलैदरम्यान १४२ विद्यार्थ्यांचा नि:शुल्क अभ्यास दौरा आयोजित केला आहे. विविध अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या पाच टॉपर विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. या संस्थेच्यावतीने ७ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप निंभोरकर यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली.
या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थी मलेशियामधील विविध स्थापत्य तंत्रज्ञानावर आधारित इमारतींचा अभ्यास करून त्याचा उपयोग अभ्यासक्रमात करणार आहेत.
हे विद्यार्थी मलेशिया येथील मेटल कार्पोरेशन, सेमी कंडक्टर निर्माण करणारी व्हिट्रोक्स टेक्नॉलॉजीस, क्वालालांपूर/पेट्रोनस ट्विन, बाटू केव्हल, जेन्टींग हायलॅन्ड, सनवे लगून वाटरराईड व चॉकलेट गॅलरीला भेट देणार आहे. संस्थेत पाच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक विद्यार्थी हा रोजगाराभिमुख होऊन स्वत:च्या पायावर उभा राहावा, असा आमचा प्रयत्न असल्याचे निंभोरकर यांनी सांगितले. गरजू व कुशल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक अडचण जाऊ नये, यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी यापूर्वी शिंगापूर, दुबई, हॉँगकॉँग आदी ठिकाणी अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेला संस्थेचे संचालक डी.जी.वाकडे, प्राचार्या एस. डी. वाकडे आदी उपस्थित होते.

Web Title: 142 students abroad for civil engineering studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.