१४०० लिटर अवैध रॉकेल जप्त

By Admin | Updated: December 22, 2015 00:11 IST2015-12-22T00:11:00+5:302015-12-22T00:11:00+5:30

नागपुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत अन्सारनगरात विविध तीन ठिकाणांवरून पोलिसांनी १४ लिटर अवैध रॉकेल सोमवारी दुपारी जप्त केले.

1400 liters illegal kerosene seized | १४०० लिटर अवैध रॉकेल जप्त

१४०० लिटर अवैध रॉकेल जप्त

अमरावती : नागपुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत अन्सारनगरात विविध तीन ठिकाणांवरून पोलिसांनी १४ लिटर अवैध रॉकेल सोमवारी दुपारी जप्त केले. हे रॉकेल फिरोज खान नामक इसमाचे असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.
अन्सारनगरात अवैध रॉकेलची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके यांच्या पथकाने अन्सारनगरात धाड टाकली. तेथे एका ठिकाणी मालवाहू आॅटोत २०० लिटर रॉकेल असल्याचे आढळून आले. मात्र, आॅटोचालक तेथे उपस्थित नव्हते. त्यामुळे पोलिसांनी ते रॉकेल जप्त केले. त्यानंतर एका ठिकाणी आणखी २०० लिटर व दुसऱ्या ठिकाणी १ हजार लिटर रॉकेलने भरलेल्या पाच टाक्या पोलिसांना आढळून आल्या. हे सर्व रॉकेल पोलिसांनी जप्त केले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: 1400 liters illegal kerosene seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.