१४०० अमरावतीकरांचा मुंबई एक्स्प्रेसने पहिल्याच दिवशी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST2021-02-05T05:29:14+5:302021-02-05T05:29:14+5:30

अमरावती : तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अंबा एक्स्प्रेस अमरावती रेल्वे स्थानकाहून मुंबईकडे निघाली. ...

1400 Amravatikars travel on the first day of Mumbai Express | १४०० अमरावतीकरांचा मुंबई एक्स्प्रेसने पहिल्याच दिवशी प्रवास

१४०० अमरावतीकरांचा मुंबई एक्स्प्रेसने पहिल्याच दिवशी प्रवास

अमरावती : तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अंबा एक्स्प्रेस अमरावती रेल्वे स्थानकाहून मुंबईकडे निघाली. पहिल्याच दिवशी १४०० प्रवाशांनी आरक्षित तिकिटावर प्रवास केला. यामुळे अमरावती रेल्वे स्थानकाला आठ लाखांचे उत्पन्न मिळाले. खा. नवनीत राणा यांनी रेल्वे स्थानकाला भेट देत प्रवाशांना शुभेच्छा दिल्यात.

रेल्वे बोर्डाने उशिरा का होईना, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सुरू करून पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा दिला. अमरावती रेल्वे स्थानकाहून आतापर्यंत अमरावती-पुणे, अमरावती-तिरुपती या दोनच गाड्या सुरू हाेत्या. मात्र, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सुरू होताच मॉडेल रेल्वे स्थानकावर रेलचेल वाढली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अंबा एक्स्प्रेसने मुंबईला निघालेले प्रवासी व त्यांना सोडण्यास येणाऱ्या नातलगांची गर्दी सोमवारी मोठ्या प्रमाणात उसळली.

यामुळे रेल्वे सुरक्षा बल व प्रशासन अलर्ट होते.

-----------------

असे झाले तिकिटांचे आरक्षण

वातानुकूलित द्वितीय श्रेणी- ९२

वातानुकूलित तृतीय श्रेणी- २६०

वातानुकूलित प्रथम श्रेणी- १६

शयनयान (स्लिपर)- ४८०

सर्वसाधारण (जनरल)- ५५२

------------------------------

बॉक्स

प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग

अमरावती रेल्वे स्थानकात गाडी प्लॅटफार्मवर येण्याच्या तासभरापूर्वी रेल्वे प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. आरक्षित तिकीट असल्याची खातरजमा केल्यानंतर प्रवाशांना प्लॅटफार्मवर सोडण्यात आले. आसन व्यवस्थेनुसार तिकिटे आहेत. रेल्वे गाडीे सॅनिटाईज करण्यात आले आहे.

Web Title: 1400 Amravatikars travel on the first day of Mumbai Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.