शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

14 वर्षांपासून वनभंगाच्या गुन्ह्यांना बगल, मुख्य वनसंरक्षकांचे दुर्लक्ष :14 हजार 400 कोटींचा महसूल बुडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:30 IST

वनक्षेत्रात नियमबाह्य बांधकाम, उत्खन्नन, गौण खनिजाची चोरी, रस्ते निर्मिती झाल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य वनसंरक्षकांनी वनभंग गुन्हे दाखल करावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

गणेश वासनिकअमरावती : वनक्षेत्रात नियमबाह्य बांधकाम, उत्खन्नन, गौण खनिजाची चोरी, रस्ते निर्मिती झाल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य वनसंरक्षकांनी वनभंग गुन्हे दाखल करावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र, राज्यात गत १४ वर्षांपासून एकही सीसीएफनी वनभंग झाल्याबाबत गुन्हे दाखल केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वनसंरक्षक नियम २००३ नियम ९ (१) नुसार केंद्र सरकारने वनभंग गुन्हे हे न्यायालयात दाखल करण्याबाबत मुख्य वनसंरक्षकांना अधिकार बहाल केले आहेत. परंतु राज्याच्या ११ प्रादेशिक विभागात एकाही सीसीएफनी वनभंग झाल्याबाबत अधिकृत गुन्हा दाखल करून त्याचा न्यायालयात पाठपुरावा केला नाही, अशी माहिती आहे. वनभंग या शब्दात वनजमिनींचा वापर वनेत्तर कामांसाठी केल्यास संबंधितांविरुद्ध वनगुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. राज्यात १९८० पूर्वी असलेल्या रस्त्याची लांबी ही अंदाजे आठ हजार कि.मी. होती. आज ती ८० हजार कि.मी. पुढे गेली आहे. वनजमिनीवर नवीन रस्ता तयार करायचा असल्यास केंद्र सरकारची परवनागी असणे आवश्यक आहे. मात्र, रस्ते निर्मिती करताना नवीन वनांच्या हद्दीत प्रती किमी सरासरी असे दोन हेक्टर असे दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक जागा  वनांची वापरली आहे. यात माती रस्त्यांचे रुपांतर मुरूम रस्त्यात, मुरूम रस्त्याचे रुपांतर डांबरीकरणात, डांबरीकरण रस्त्याचे रुपांतर सिमेंट रस्त्यात झाले आहे. तसेच तीन मीटर लांबीचे रस्ते २४ मीटर, १२ मीटर रुंदीचे रस्ते २४ मीटर व २४ मीटर रुंदीचे रस्ते ६० मीटर झाले आहेत. रस्ते रुंदीकरणात वापरलेल्या वनजमिनींची पूर्वपरवानगीही केंद्र सरकारकडून घेण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने महत्त्वाच्या २ ते ३ टक्के प्रकल्पासाठीच राज्यात वनजमिनींची परवानगी दिली आहे. राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३ लक्ष ६ हजार चौरस किमी असून ६३ हजार चौरस किमी क्षेत्र हे वनविभागाच्या ताब्यात आहे. राज्यात साडेतीन लाख किमी रस्त्यांपैकी ७२ हजार किमी रस्ते हे वनहद्दीतून गेले आहेत. मात्र रस्ते रुंदीकरणासाठी वापरल्या गेलेला अतिरिक्त वनजमिनीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतलेला नाही, अशी माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वनजमिनींची ठरविलेली नक्त रक्कम २० लाख हेक्टर प्रमाणे १४ हजार ४०० कोटी निष्क्रिय वनाधिका-यांनी वसूल करण्यास दिरंगाई केल्याचे वास्तव समोर आले आहे. वनभंगाबाबतचे गुन्हे दाखल का करण्यात आले नाही, याविषयी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान वनसचिव विकास खारगे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

रस्ते निर्मिती कंत्राटदारांना अभय-वनजमिनींवर विनापरवानगीने रस्ते निर्मित होत असताना वनाधिका-यांकडून संबंधित कंत्राटदाराविरुद्ध वनभंगाचे गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याला अभय दिले जाते. त्यामुळे वनविभागाला कोणीही जुमानत नाही, ही बाब समोर आली आहे. यापूर्वी वनभंग केल्याप्रकरणी दोन माजी वनमंत्र्यांना जेलची हवा खावी लागली, हे विसरता येणार नाही.वनभंग म्हणजे काय?वनजमिनीवर अतिक्रमण करणे, वनजमिनींचा गैरवापर, नियमबाह्य रस्ते निर्मिती करणे, प्रकल्प उभारणे म्हणजे वनभंग करणे होय.