शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

14 वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशात बाल विवाह, पतीकडून बलात्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

 पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीचा तिची आई आणि मामाने डिसेंबर २०२१ मध्ये जबरदस्तीने मध्य प्रदेशात विवाह करून दिला. तेथे त्या मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आला. सबब, सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली.  इकडे माहेरी आईने नवऱ्याकडे का जात नाही, म्हणून तिला मारहाण सुरू केली. अखेर २२ एप्रिल रोजी तिने वरूड पोलीस ठाणे गाठले. आपबीती पोलिसांना सांगितली.

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशात जुन्नारदेव तालुक्यातील  एका गावात २०२१ मध्ये बालविवाह करण्यात आला. त्या बालिकेसोबत तिच्या आरोपी पतीने बळजबरीने शारीरिक संबंधदेखील प्रस्थापित केले. याप्रकरणी वरूड पोलिसांनी १४ मे रोजी तिचे बळजबरीने लग्न लावून देणाऱ्या तिच्या आईसह, पती, सासू, मामा व मध्यस्थी करणाऱ्यांसह एकूण पाच जणांविरुद्ध भादंविचे कलम कलम ३७६(३), ३४, पॉस्को, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. हा सर्व घटनाक्रम १ एप्रिल २०२१ ते १२ मे २०२२ दरम्यान घडला.  वरूड पोलिसांनी गुन्हे दाखल करून ती केसडायरी छिंदवाडा जिल्ह्यातील नवेगाव पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे.  पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीचा तिची आई आणि मामाने डिसेंबर २०२१ मध्ये जबरदस्तीने मध्य प्रदेशात विवाह करून दिला. तेथे त्या मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आला. सबब, सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली.  इकडे माहेरी आईने नवऱ्याकडे का जात नाही, म्हणून तिला मारहाण सुरू केली. अखेर २२ एप्रिल रोजी तिने वरूड पोलीस ठाणे गाठले. आपबीती पोलिसांना सांगितली. यानंतर महिला पोलिसांकडून तपास करून पोलीस अधीक्षक आणि एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली १४ मे रोजी सायंकाळी ६.४४ वाजता उशिरा गुन्हा दाखल केला.

यांच्याविरुद्ध गुन्हा : १४ वर्षीय पीडिताच्या तक्रारीवरून तिची आई, मामा लालमन छन्नू बगाहे (रा. सिंदरेही, माधव ठाणा, नवेगाव, छिंदवाडा), तिचा पती दुर्गेश रामदास बेले, एक महिला व या बालविवाहात मध्यस्थी करणारा उमेश बेले (तिघेही रा. छिपना पिपरिया, ठाणा बोरदेही, ता. छिंदवाडा) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळ मध्य प्रदेशातील असल्याने तो गुन्हा जुन्नरदेव तालुक्यातील नवेगाव पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला. अल्पवयीन मुलीला बाल सुधारगृहात पाठविले आहे.

अल्पवयीन मुलीची तिची आई व  मामाने फसवणूक केली. तिला मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागले. कुणी ऐकत नसल्याने तिने पोलिसांची मदत घेतली. गुन्हा दाखल करून सामाजिक भावनेने मदत केली. पोलिसांमुळे तिचे प्राण वाचले.- प्रदीप चौगावकर,  ठाणेदार

 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस