अवैध दारुसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:12 IST2021-04-13T04:12:54+5:302021-04-13T04:12:54+5:30

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी राधानगरात कारवाई करून एक महागडी कार व अवैध दारू असा एकूण १४ लाख ३० हजारांचा ...

14 lakh worth of illicit liquor seized | अवैध दारुसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारुसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी राधानगरात कारवाई करून एक महागडी कार व अवैध दारू असा एकूण १४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल रविवारी जप्त केला.

पोलिसांनी महागड्या कारमधून देशी दारूच्या १० बॉक्स आढळले. याप्रकरणी आरोपी रत्नदीप श्रीधरराव बागडे (३७, रा. अमरावती)विरुद्ध भादंविचे कलम ६५(अ),(ई), ७७(अ) सदर गुन्ह्यांमध्ये वापरलेली महागडी कार १४ लाख रुपये व देशी दारू ३० हजार रुपये असा एकूण १४ लाख ३० हजार रुपयांचा माल मिळून आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, एपीआय महेश इंगोले, पोलीस हवालदार नरेंद्र ढोबळे, पोलीस नायक, गणेश तवार, जहीर शेख, पोलीस शिपाई रणजित गावंडे, राज देवीकर, अमित गोफने, चालक पांडुरंग बुधवंत यांच्या पथकाने केली.

Web Title: 14 lakh worth of illicit liquor seized