राजुऱ्यातील १४ व्यावसायिक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:27+5:302021-04-05T04:12:27+5:30
राजुरा बाजार : परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या राजुरा बाजार येथील १४ व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ ...

राजुऱ्यातील १४ व्यावसायिक पॉझिटिव्ह
राजुरा बाजार : परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या राजुरा बाजार येथील १४ व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. परिणामी, ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने येथील बाजारपेठ पाच दिवसांकरिता बंद केली.
परिसरातील १५ पेक्षा अधिक गावांतील नागरिक बँक, दवाखाना, पतसंस्था, महावितरण कार्यालय, बाजारपेठ निमित्ताने राजुऱ्यात येत असतात. शनिवारी तालुक्यात ४४, तर राजुरा येथे १४ जण पॉझिटिव्ह आढळल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीची बैठक आयोजित करून बाजारपेठ ८ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गावात कंटेन्मेंट झोन आखून गावातील नागरिकांना सजग करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सरपंच नीलेश धुर्वे, उपसरपंच प्रशांत बहुरुपी, वैद्यकीय अधिकारी शुभा शेळके यांनी सहभाग नोंदविला.