शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून बांधले १४ बंधारे

By admin | Updated: May 25, 2016 00:35 IST

श्रमदानातून जगंलात १४ बंधारे बांधून वन्यप्रेमींनी वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली.

वन्यप्रेमींचे पाऊल : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबलीअमरावती : श्रमदानातून जगंलात १४ बंधारे बांधून वन्यप्रेमींनी वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली. जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेच्या ४० वन्यप्रेंमीने जलमित्र बनून हे पाऊल उचलल्याने उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भंटकती थांबल्याचे अनुभवास आले. उन्हाळ्यात शहरातील नागरिक पाण्याचे सोय करून घेऊ शकतात. मात्र, प्रश्न पडतो जगंलातील वन्यप्राण्यांनाच. जगंलात पाण्याची कमतरता भासल्यास हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वाटचाल करतात. अशावेळी मानव व वन्यप्राणी संघर्ष उदभवू शकतो. मात्र, जर जगंलात वन्यप्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास ते शहराकडे येण्याची शक्यता कमी असते. वन्यप्राण्यांना जंगलात पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केली आहेत. मात्र, वन्यप्राण्यांना आणखी मुबलक पाण्याची गरज भासू शकते. उन्हाळ्यात पोहरा-चिरोडी जंगलातील पाण्याचे संकट बघता संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या परवानगीने बंधारे बांधण्यास सुरुवात केली होती. केवळ दोन महिन्यांत श्रमदानातून १४ बंधारे बांधण्यात आल्याने यामध्ये आजही पाणीसाठा उपलब्ध आहे. शिकार व अपघात कमी झालेत. त्यातच वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. 'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानातून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. या प्रेरणातून जलमित्र ठरलेले संस्था अध्यक्ष सागर मैदानकर, राम खरबडे, मिलिंद वानखडे, बहादेकर, अमित मस्करे, अमेय परांजपे, प्रमोद सावरकर, राजू विघे, आदित्य कर्दुल्कर, आशिष ढाकुलकर, सचिन कापसे, सुश्रुत चौधरी, पराग पनपालिया, योगेश दंडाळे, शुभम गायकवाड यांनी हे बंधारे बांधून वन्यप्राण्यांची तृष्णातृप्तीची सोय केली आहे. (प्रतिनिधी)