श्रमदानातून बांधले १४ बंधारे

By Admin | Updated: May 25, 2016 00:35 IST2016-05-25T00:35:41+5:302016-05-25T00:35:41+5:30

श्रमदानातून जगंलात १४ बंधारे बांधून वन्यप्रेमींनी वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली.

14 bonds built from labor | श्रमदानातून बांधले १४ बंधारे

श्रमदानातून बांधले १४ बंधारे

वन्यप्रेमींचे पाऊल : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबली
अमरावती : श्रमदानातून जगंलात १४ बंधारे बांधून वन्यप्रेमींनी वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करून दिली. जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेच्या ४० वन्यप्रेंमीने जलमित्र बनून हे पाऊल उचलल्याने उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भंटकती थांबल्याचे अनुभवास आले.
उन्हाळ्यात शहरातील नागरिक पाण्याचे सोय करून घेऊ शकतात. मात्र, प्रश्न पडतो जगंलातील वन्यप्राण्यांनाच. जगंलात पाण्याची कमतरता भासल्यास हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वाटचाल करतात. अशावेळी मानव व वन्यप्राणी संघर्ष उदभवू शकतो. मात्र, जर जगंलात वन्यप्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्यास ते शहराकडे येण्याची शक्यता कमी असते. वन्यप्राण्यांना जंगलात पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केली आहेत. मात्र, वन्यप्राण्यांना आणखी मुबलक पाण्याची गरज भासू शकते. उन्हाळ्यात पोहरा-चिरोडी जंगलातील पाण्याचे संकट बघता संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाच्या परवानगीने बंधारे बांधण्यास सुरुवात केली होती. केवळ दोन महिन्यांत श्रमदानातून १४ बंधारे बांधण्यात आल्याने यामध्ये आजही पाणीसाठा उपलब्ध आहे. शिकार व अपघात कमी झालेत. त्यातच वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. 'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानातून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. या प्रेरणातून जलमित्र ठरलेले संस्था अध्यक्ष सागर मैदानकर, राम खरबडे, मिलिंद वानखडे, बहादेकर, अमित मस्करे, अमेय परांजपे, प्रमोद सावरकर, राजू विघे, आदित्य कर्दुल्कर, आशिष ढाकुलकर, सचिन कापसे, सुश्रुत चौधरी, पराग पनपालिया, योगेश दंडाळे, शुभम गायकवाड यांनी हे बंधारे बांधून वन्यप्राण्यांची तृष्णातृप्तीची सोय केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 14 bonds built from labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.