१३ वर्षीय बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:13 IST2021-05-22T04:13:12+5:302021-05-22T04:13:12+5:30

वरूड : तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय बालिकेवर पाच युवकांनी जानेवारी महिन्यापासून सतत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले. ...

13 year old girl tortured | १३ वर्षीय बालिकेवर अत्याचार

१३ वर्षीय बालिकेवर अत्याचार

वरूड : तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय बालिकेवर पाच युवकांनी जानेवारी महिन्यापासून सतत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केले. ते अश्लील फोटो काढून फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

सदर बालिका साडेतीन महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडित बालिकेच्या आईने २० मे रोजी रात्री उशिरा तक्रार दाखल केल्यावरून वरुड पोलिसांनी बलात्कार आणि पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेऊन पाचही युवकांना अटक केली. सौरभ लक्ष्मण शेळके (२३), शुभम गणेश भोगे (२२), मनोज नामदेव मानकर (३३), आकाश भीमराव ठाकरे २२ (सर्व रा. मोरचुंद), प्रीतम अनवाणे (२४, रा. उदापूर) असे आहे.

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय बालिकेवर यातील सौरभ शेळके याने २५ जानेवारी पासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला. यावेळी शुभम भोगे याने सुद्धा लैंगिक शोषण केले. आणि अत्याचार करताना मोबाइलमध्ये अश्लील फोटो काढून कुणाला सांगितले तर व्हायरल करण्याची धमकी दिली. तर यातील मनोज मानकर, आकाश ठाकरे, प्रीतम अनवाणे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. आरोपीच्या या कृत्यामुळे पीडित बालिका साडेतीन महिन्याची गर्भवती झाली. वरुड पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंविचे कलम ३७६(३), ३७६(डी,ए), ४५२,५०६, सहकलम ४, ८, १२ बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल करून रात्रभर आरोपींचा शोध घेऊन सकाळ पर्यंत पाचही आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, ठाणेदार प्रदीप चौगावकार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर, एपीआय सुनील पाटील, हेमंत चौधरी, सारिका बागडे, ललित तायडेसह वरूड पोलीस करीत आहे.

Web Title: 13 year old girl tortured