१३ ग्रामीण पोलीस ठाण्यांत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:45+5:302021-02-05T05:26:45+5:30

(फोटो आहे. ) अमरावती : ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या संकल्पनेतून आतापर्यंत १३ ग्रामीण पोलीस ठाण्यात ...

In 13 rural police stations, Dr. APJ Abdul Kalam practice implemented | १३ ग्रामीण पोलीस ठाण्यांत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका कार्यान्वित

१३ ग्रामीण पोलीस ठाण्यांत डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका कार्यान्वित

(फोटो आहे. )

अमरावती : ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या संकल्पनेतून आतापर्यंत १३ ग्रामीण पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी अद्ययावत सुविधेसह डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका या नि:शुल्क प्रवेशासह सुरू करण्यात आल्या आहेत.

अद्ययावत अभ्यासिकांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, पोलीस भरतीसंदर्भात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त पुस्तके व मार्गदर्शन उपलब्ध राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. या अभ्यासिकेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना २४ तास सुविधा मिळणार आहे. अभ्यासिका ही पोलीस ठाणे आवारात राहणार असल्याने सुरक्षितताही लाभणार आहे. इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे, फ्लेक्स, बोर्डदेखील अभ्यासिकेत लावण्यात येणार आहेत. उर्वरित इतर सर्व पोलीस ठाण्यांतसुद्धा लवकरच अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याचे एसीपींनी सांगितले. पोलीस ठाण्यात अभ्यासिका हा उपक्रम राबविणारा अमरावती हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत.

Web Title: In 13 rural police stations, Dr. APJ Abdul Kalam practice implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.