शासकीय नोकरीचे आमिष दाखवून १३ लाखांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:48+5:302021-03-13T04:22:48+5:30

नरेंद्र गोपाल बरडे (३२ रा. अप्परवर्धा वसाहत क्वॉर्टर, शिवाजी नगर) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी श्रावण दशरथ चौधरी (रा. कमिशनर ...

13 lakhs wasted by showing the lure of government job | शासकीय नोकरीचे आमिष दाखवून १३ लाखांनी गंडविले

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून १३ लाखांनी गंडविले

नरेंद्र गोपाल बरडे (३२ रा. अप्परवर्धा वसाहत क्वॉर्टर, शिवाजी नगर) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी श्रावण दशरथ चौधरी (रा. कमिशनर कॉलनी) व महेश नारायण जोशी (रा. गणपतीनगर, शेगाव) यांचेविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.

नरेंद्र बरडे यांना वरिष्ठ पदावर तर त्यांच्या वहिनीला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले. त्याचप्रमाणे नरेंद्र यांचा मित्र दिपक सहदेव चव्हाण (रा. निलक्रांती सोसायटी रिंग रोड, नवसारी) यांना शेतीचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले. त्यासाठी आरोपींनी नरेंद्रकडून प्रथम ७ लाख तर त्यांच्या मित्राकडून १० लाख रुपये घेतले. परंतु नोकरी लावून दिली नाही, तसेच शेतीचा वाढीव मोबादला मिळवून दिला नाही. त्यामुळे नरेंद्र व त्याच्या मित्राने आरोपींना पैसे परत मागितले. त्यामुळे आरोपींनी दिलेल्या रकमेपैकी नरेंद्रला दीड लाख रुपये बँक खात्यात परत टाकले. उर्वरित रक्कम रोख स्वरुपात दिली. त्यांच्या मित्राला बॅकेमार्फत व रोख स्वरुपात १० लाख रुपये परत केले. परंतु त्यापैकी प्रत्येकी २ लाख रुपये परत करून उर्वरित १३ लाखांची रक्कम आरोपींनी परत केली नाही. त्यामुळे हा फसवणुकीचा प्रकार पाहून नरेंद्र यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली.

Web Title: 13 lakhs wasted by showing the lure of government job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.