१३ जोडप्यांचे सामूहिक शुभमंगलम्!

By Admin | Updated: May 10, 2015 23:52 IST2015-05-10T23:52:29+5:302015-05-10T23:52:29+5:30

शेतकरी सर्वच बाजूंनी संकटात सापडला आहे. कर्जबाजारीपणामुळे वय वाढून गेल्यानंतरही मुलींचे विवाह करणे ...

13 Congregation Shubhamangalam! | १३ जोडप्यांचे सामूहिक शुभमंगलम्!

१३ जोडप्यांचे सामूहिक शुभमंगलम्!

बडनेरा येथे आयोजन : बावणे कुणबी समाजाचा मेळावा
बडनेरा : शेतकरी सर्वच बाजूंनी संकटात सापडला आहे. कर्जबाजारीपणामुळे वय वाढून गेल्यानंतरही मुलींचे विवाह करणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. अशा स्थितीवर मात करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता बावणे कुणबी समाजाच्यावतीने बडनेऱ्यात सामूहिक विवाह सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्यात १३ जोडपे विवाहबध्द झालेत.
यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे प्रामुख्याने उपस्थित होते. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाल्याने प्रत्येक समाजाने असे आदर्श विवाह सोहळ्याचे आयोजन करावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. बडनेऱ्यातील जुन्या वस्तीतील सावता मैदानात आयोजित विवाह सोहळ्याला १० हजारांच्या जवळपास नागरिकांची उपस्थिती होती. पालकमंत्र्यांसह वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप लाकडे, श्रीराम टिचकुले, शिवा निंबर्ते, देवराम मते, पद्माकर भगोले, नानासाहेब बुंदे, गणेश भोयर, विश्वास तुमसरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रिती-रिवाजानुसार हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी प्रकाश बांते, शिवा निंबर्ते, सुभाष कडव, लिलाधर ठवकर, रितेश बोंद्रे, सुभाष कुकडे, योगेश निमकर, नीलेश चामर, राजू बुंदे, मनीष कुथे, ललित झंझाड, रामू कातोरे, पंकज बांडाबुचे आदींनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी घेतला जेवणाचा आस्वाद
बडनेरा येथील सावता मैदानावर आयोजित बावणे कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी भर पंगतीत जेवणाचा आस्वाद घेतला. आयोजकांनी त्यांच्यासाठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था केली होती. मात्र, त्यांनी पंगतीतच जेवणाचा आग्रह धरला.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी हा प्रयोग
विदर्भात वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कुणबी समाजाने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केल्याचे वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप लाकडे यांनी उद्घाटनाप्रसंगी काढले. बडनेऱ्यात रविवारी सामूहिक विवाह सोहळ्याचे दिमाखदार आयोजन पार पडले. या सोहळ्यात विदर्भातून १३ जोडप्यांचे शुभमंगल पार पडले. कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: 13 Congregation Shubhamangalam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.