कुष्ठा येथील १३ लाभार्थी घरकुलापासून वंचित

By Admin | Updated: August 26, 2015 00:07 IST2015-08-26T00:07:54+5:302015-08-26T00:07:54+5:30

अचलपूर तालुक्यातील कुष्ठा येथील अपीलपात्र १३ लाभार्थी इंदिरा आवास योजनेच्या घरकुलापासून पाच वर्षांपासून ...

13 Beneficiaries of leprosy have been denied housing | कुष्ठा येथील १३ लाभार्थी घरकुलापासून वंचित

कुष्ठा येथील १३ लाभार्थी घरकुलापासून वंचित

अमरावती : अचलपूर तालुक्यातील कुष्ठा येथील अपीलपात्र १३ लाभार्थी इंदिरा आवास योजनेच्या घरकुलापासून पाच वर्षांपासून वंचित असल्याने लाभार्थ्यामध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.
कुष्ठा येथील केशव पाटील, मनोहर मते, अंबादास मिसळकर, शिला मडघे, संध्या पापळकर, जानराव वडुरकर, गजानन बोंदरे, एकनाथ कपिले, रवींद्र येवतकार, दत्ता चौधरी, बिंंदू गायकवाड, सुरेश येवतकार, श्रीकृष्ण वडूरकर या लाभार्थ्यांचे प्रकरण लोकशाही दिनात चालू असताना उपआयुक्त विकास यांनी आमच्या अंतिम पुरवणी प्रतीक्षा यादीला परवानगी मिळण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव विभागीय लोकशाही दिनी विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती यांना निर्गमित केले होते. तेव्हाच गटविकास अधिकारी अचलपूर यांनी प्रकरणास्बिंंधी महितीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर केला होता. परंतु अद्यापही पात्र लाभार्थ्यांचे नाव घरकूलाच्या यादीत समाविष्ट केले नसल्याने त्यांना न्याय मिळालेला नाही. (वार्ताहर)

Web Title: 13 Beneficiaries of leprosy have been denied housing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.