१२० गणेश मंडळांत पोलिसांनी केली आरती
By Admin | Updated: September 12, 2016 00:10 IST2016-09-12T00:10:27+5:302016-09-12T00:10:27+5:30
जातीय सलोखा राहण्याच्या उद्देशाने पोलिसांनी शहरातील तब्बल १२० सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीची आरती केली.

१२० गणेश मंडळांत पोलिसांनी केली आरती
जातीय सलोखा राखण्याचा उद्देश : पोलीस आयुक्तांची लोकाभिमुख संकल्पना
अमरावती : जातीय सलोखा राहण्याच्या उद्देशाने पोलिसांनी शहरातील तब्बल १२० सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीची आरती केली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची ही संकल्पना अमरावतीकरांसाठी विशेष आकर्षण ठरली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात तब्बल ५४४ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. गणेशोत्सवाचा उत्साह व आनंद साजरा करीत असताना नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या दृष्टीने पोलिसांनी हे आगळे-वेगळे पाऊल उचलले आहे. पोलीस व जनतेमध्ये सौहार्दपूर्ण संबध निर्माण व्हावे व जातीय सलोखा रहावा, अशी संकल्पना पोलीस आयुक्त मंडलिक यांची होती. त्या अनुषंगाने शहरातील सार्वजनिक गणेश मंडळातील पदाधिकारी, गणेशभक्त व संबमधीत पोलीस ठाण्यात सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदारांमार्फत गणपतीची आरती व पूजा आयोजित करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२० गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीची आरती व पूजा केली. यामध्ये राजापेठ १७, कोतवाली ११, खोलापुरी गेट १२, भातकुली १०, फे्रजरपुरा ११, बडनेरा १०, नांदगाव पेठ १०, गाडगेनगर १८, वलगाव १२ व नागपुरी गेट ९ या गणेश मंडळांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
महादेवखोरीतील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप
गणेश मंडळांना भेटी देऊन पूजा व आरती करण्याचा उपक्रम पोलिसांनी यंदा राबविला असून सोबतच महादेव खोरी परिसरातील शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाद्वारे गरीब व गरजू २५ विद्यार्थ्यांना पुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप केले.