महापौरपदासाठी १२ अर्जांची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 06:00 IST2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:48+5:30
शहराच्या १६ व्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्जांची उचल व दाखल करण्यासाठी १८ नोव्हेंबरची 'डेडलाईन' आहे. महापौरपदासाठी आतापर्यंत १२ अर्जांची उचल करण्यात आली आहे. यामध्ये बबलू शेखावत यांनी ३, चेतन पवार २, अब्दूल नाजिम २, सुमती ढोके १, सुनील काळे २, प्रशांत वानखडे यांनी २ अर्जांची उचल केली.

महापौरपदासाठी १२ अर्जांची उचल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापौरपदासाठी आतापर्यंत १२ व उपमहापौरपदासाठी १६ उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आलेली आहे. अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. सोमवारी अर्ज उचल व दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे कोणते उमेदवार अर्ज दाखल करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शहराच्या १६ व्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्जांची उचल व दाखल करण्यासाठी १८ नोव्हेंबरची 'डेडलाईन' आहे. महापौरपदासाठी आतापर्यंत १२ अर्जांची उचल करण्यात आली आहे. यामध्ये बबलू शेखावत यांनी ३, चेतन पवार २, अब्दूल नाजिम २, सुमती ढोके १, सुनील काळे २, प्रशांत वानखडे यांनी २ अर्जांची उचल केली. उपमहापौरपदासाठी आतापर्यंत १६ अर्जांची उचल करण्यात आली. यामध्ये बबलू शेखावत २, चेतन पवार २, सुमती ढोके १, अब्दूल नाजिम २, अजय गोडांणे २, सुनील काळे २, आशिष गावंडे १, संगीता बुरंगे २, प्रशांत वानखडे २ व सपना ठाकूर यांनी १ उमेदवारी अर्जाची उचल केलेली आहे. सोमवार हा अंतिम दिनांक असल्याने किती उमेदवार अर्जाची उचल करतात व किती उमेदवार अर्ज दाखल करतात, याकडे लक्ष लागले आहे.
महाशिवआघाडीच्या हालचाली गतिमान
राज्यातील बदलत्या समीकरणानंतर शहरातदेखील महाशिवआघाडीचे नवीन समीकरण समोर आले आहे. शहराच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासह विरोधीपक्ष नेता बबलू शेखावत, ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले यादृष्टीने कामाला लागले आहेत. गेल्या अडीच वर्षांत सत्तारुढ पक्षाच्या अनेक सदस्यांना प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळालेला नसल्याने नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यातील काही मासे गळाला लागतील काय, याची चाचपणी आता विरोधकांकडून सुरू झालेली आहे.