‘स्थायी’चे सभापती निवडीसाठी ११ ला सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST2021-03-09T04:15:58+5:302021-03-09T04:15:58+5:30
(महापालिका लोगो) अमरावती : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपद १ मार्चपासून रिक्त असल्याने ११ मार्च रोजी पीठासीन अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या ...

‘स्थायी’चे सभापती निवडीसाठी ११ ला सभा
(महापालिका लोगो)
अमरावती : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपद १ मार्चपासून रिक्त असल्याने ११ मार्च रोजी पीठासीन अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष सभा होणार आहे. १६ सदस्यांच्या सभागृहात भाजपचे नऊ सदस्य असल्याने सभापतिपदासाठी इच्छुकांची लॉबिंग सुरू झाली आहे. मंगळवारी कोअर कमिटीच्या बैैैैैठकीमध्ये याविषयी चर्चा होऊन संभाव्य नावे प्रदेशपातळीवर पाठविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी १८ फेब्रुवारीच्या आमसभेत नव्या आठ सदस्यांची निवड करण्यात आली. एमआयएमच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त पदावर अन्य सदस्याची निवड याच सभेत करण्यात आली होती. त्यानंतर नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांना पत्र देऊन सभेसाठी तारीख मागितली होती. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना प्राधिकृत केले. त्यांनी सभापती निवडीसाठी ११ मार्च रोजी विशेष सभा बोलावलेली आहे. महापालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून फिजिकल डिस्टन्स राखत ही सभा होणार आहे. गुरुवारी सकाळी ९ ते १०.३० या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे व त्यानंतर ११वाजता सभा प्रारंभ होणार आहे.
बॉक्स
स्थायी समिती सभापतिपदाचे विद्यमान कार्यकाळातील हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे भाजपमध्ये रस्सीखेच आहे. सध्या चार दावेदारांची नावे समोर आली आहेत. यात माजी आमदार सुनील देशमुख, माजी पालकमंत्री व आमदार प्रवीण पोटे तसेच महापौर चेतन गावंडे, शहराध्यक्ष किरण पातूरकर व गटनेता तुषार भारतीय यांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. आगामी निवडणूक लक्षात घेऊन कुणाला कौल मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.